HDFC बँकेची मोठी उडी ! RBI ने निर्बंध हटवल्यानंतर दररोज बनवले 11 हजारांहून जास्त क्रेडिट कार्ड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने ऑगस्ट 2021 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने लादलेले निर्बंध हटवल्यापासून दररोज सरासरी 11,110 क्रेडिट कार्ड जारी केले आहेत. बँकेने म्हटले आहे की,” त्यांच्या डिजिटल बँकिंग सेवांवरील बंदी उठवल्यानंतर त्यांनी 21 सप्टेंबर 2021 पर्यंत 4 लाखांहून अधिक क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, जो एक विक्रम आणि मोठी उडी आहे.”

‘बंदीदरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई बँक करेल’
एचडीएफसी बँकेचे पेमेंट्स, कन्झ्युमर फायनान्स, डिजिटल बँकिंग आणि आयटीचे प्रमुख पराग राव म्हणाले की,”एचडीएफसी बंदीच्या काळात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी क्रेडिट कार्ड अधिक जलद बनवतील.” ते म्हणाले की,”बँकेने आपला क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओ सुधारण्यासाठी, प्रॉडक्ट्स आणि पार्टनरशिप मजबूत करण्यासाठी आणि नवीन करण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीचा वापर केला आहे.” 17 ऑगस्ट रोजी बंदी उठवण्यात आल्यापासून बँकेने 21 सप्टेंबर 2021 दरम्यान 36 दिवसांत विक्रमी नवीन क्रेडिट कार्ड युझर्सची भर घातली. यासाठी बँकेने प्रत्येक विभागाला डोळ्यासमोर ठेवून ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा दिल्या आहेत.

RBI ने का आणि कशासाठी घातली होती बंदी
राव म्हणाले की,”इतक्या कमी कालावधीत बँकिंग इंडस्‍ट्रीमध्ये नवीन क्रेडिट कार्डांची ही सर्वाधिक संख्या आहे. आमच्यासाठी हा मैलाचा दगड आहे.” ते म्हणाले की, “आम्ही सतत वाढ साध्य करण्याच्या धोरणावर काम करत आहोत.” गेल्या दोन वर्षांत, डिजिटल बँकिंग, कार्ड आणि बँकेच्या प्लॅटफॉर्मवरील पेमेंटशी संबंधित अनेक मुद्द्यांवरील तांत्रिक त्रुटींमुळे, RBI ने कारवाई केली आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास आणि कोणतेही नवीन डिजिटल प्रॉडक्ट्स सुरू करण्यास बंदी घातली.” HDFC बँक क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या बाबतीत देशात आघाडीवर आहे, परंतु डिसेंबर 2020 पासूनच बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर बंदी घातल्याने बाजारातील त्यांचा वाटा कमी झाला.

Leave a Comment