मुंबईकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि रोमांचक बातमी समोर आली आहे! देशाची आर्थिक राजधानी लवकरच एका नव्या मेट्रो मार्गाची साक्ष देणार आहे. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान ‘मेट्रो लाईन 8’ साकार होणार असून, या मार्गात आता लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे!
‘मेट्रो 8’ मध्ये काय आहे खास?
- एकूण लांबी : सुमारे 11 किलोमीटर
- मार्ग : मुंबई विमानतळ – मानखुर्द – नवी मुंबई विमानतळ
- स्थानके : यात काही स्थानके *भुयारी, तर काही *उन्नत स्वरूपात असतील
- संपूर्ण प्रकल्प : PPP (Public Private Partnership) तत्वावर उभारण्यात येणार
- प्रस्ताव तयार : सिडकोकडून सुधारित आराखडा तयार, आता राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार
या नव्या मेट्रो मार्गामुळे पूर्व मुंबईतील प्रवाशांना मेट्रोची थेट सोय उपलब्ध होणार असून, वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे, LTT स्थानक आता थेट मेट्रोशी जोडले जाणार असल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे आणि प्रवास आणखी सुलभ होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे घाटकोपर ते इस्टर्न एक्स्प्रेस हायवे हा भाग भुयारी असेल, तर मानखुर्दपर्यंतचा मार्ग उन्नत रचनेत असणार आहे.




