मोठी बातमी! औरंगाबाद मध्ये कर्फ्यू जाहीर; १० ते १८ जुलै दरम्यान संचारबंदी जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होते आहे. जिल्ह्यात रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कर्फ्यू जाहीर करण्याचे ठरविले आहे. दिनांक १० जुलै ते १८ जुलै  या कालावधीत जिल्ह्यात कर्फ्यू असणार आहे. आज लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबाद शहर आणि वाळूज परिसरात कडक संचारबंदी असणार आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयात उद्योगही बंद राहणार बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात वाढणारे रुग्ण ही चिंतेची बाब बनली असून त्याबाबतीत कठोर पावले उचलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

दरम्यान जिल्ह्यात १५० कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार १९६ रुग्ण उपचार घेत आहेत. आज वाढ झालेल्या रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील १०१ तर ग्रामीण भागातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६ हजार ८८० रुग्ण आढळून आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment