सामान्य माणसासाठी मोठी बातमी! तुमचा एलपीजी सिलिंडर बुकिंगचा फोन नंबर बदलला, त्वरित तपासून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी असलेली IOC (India Oil Corporation) गॅस एजन्सी इंडेन नावाने डिस्ट्रीब्यूशन सर्विस चालवते. जर आपण आपला घरगुती एलपीजी सिलेंडर रिफिल करण्यासाठी मोबाईल क्रमांकावरून बुकिंग करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. जर आपण इंडेनचे ग्राहक असाल तर यापुढे आपण जुन्या क्रमांकाव गॅस बुक करू शकणार नाही. इंडेनने आपल्या एलपीजी ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर गॅस बुकिंगसाठी एक नवीन नंबर पाठविला आहे. याद्वारे आपण सिलेंडर बुक करू शकता.

इंडियन ऑईलद्वारे जारी केलेला हा नंबर इंडियन देशातील ग्राहक आयव्हीआर किंवा एसएमएसद्वारे गॅस बुकिंगसाठी वापरु शकतात. इंडियन ऑईलने सांगितले की यापूर्वी एलपीजी बुकिंगसाठी देशातील वेगवेगळ्या सर्कलसाठी वेगवेगळे मोबाइल नंबर होते. आता देशातील या सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपनीने सर्व सर्कलसाठी एकच क्रमांक जारी केला आहे, याचाच अर्थ असा आहे की, आता इंडेन गॅसच्या ग्राहकांना देशभरात एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी 7718955555 वर कॉल किंवा एसएमएस पाठवावा लागेल.

इंडियन ऑइलने सांगितले की, आता कंपनीचे एलपीजी ग्राहक या क्रमांकाद्वारे कोणत्याही वेळी त्यांचे गॅस सिलिंडर बुक करू शकतील.

जर तुम्हाला कॉल करून एलपीजी सिलिंडर बुक करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून दिलेल्या क्रमांकावर कॉल करावा लागेल. यानंतर, आपल्याला गॅस रीफिलिंगसाठी योग्य तो पर्याय निवडावा लागेल.

आपणास एसएमएसद्वारे गॅस सिलेंडर बुक करायचे असल्यास आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून तुम्हाला एसएमएस पाठवावा लागेल. इंडेनने जारी केलेल्या या देशव्यापी क्रमांकामुळे कंपनीच्या ग्राहकांना बरीच सुविधा मिळू शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment