LIC ची पॉलिसी खरेदी केलेल्यांसाठी मोठी बातमी; पैसे काढण्याचा ‘हा’ नियम ३० जूनपर्यंत शिथिल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसी-जीवन विमा कॉर्पोरेशनने कोरोनाच्या या संकटात ग्राहकांना दिलासा देताना आपल्या मॅच्युरिटी क्लेमचे नियम अगदी सुलभ केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आता कोणत्याही ग्राहकांना मॅच्युरिटी क्लेम मिळण्यासाठी एलआयसीच्या शाखेत जाण्याची गरज नाही. ग्राहक आता त्यांची पॉलिसी, केवायसी कागदपत्रे, डिस्चार्ज फॉर्म आणि इतर कागदपत्रे ईमेलद्वारे स्कॅन करुन संबंधित शाखेत पाठवून आपला हक्क मिळवू शकतात. या संदर्भात एलआयसीने आपल्या वेबसाइटवर नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. यात त्यांनी सांगितले आहे की, ३० जूनपर्यंत ग्राहकांना ही सुविधा मिळेल.

क्लेम करण्यासाठीचा नियम
एलआयसीच्या नियमांनुसार यासाठी आपली पॉलिसी सुरु असणे आवश्यक आहे, आपली पॉलिसी ज्या ब्रँच ऑफिस मधून दिली गेली आहे, तिथेच भरली जावी तसेच या पॉलिसीवर कोणत्याही प्रकारची थकबाकी असू नये.

तसेच कोणतीही डुप्लिकेट पॉलिसी जारी केलेले नसावी. सर्व्हायवल बेनिफिट क्लेमच्या बाबतीत, सर्व्हायवल क्लेमचा एकूण लाभ हा ५ लाखांपर्यंतचा असावा. मॅच्युरिटी क्लेम असल्यास पॉलिसीची विमा रक्कम ५ लाखांपर्यंत असावी.

एलआयसी पॉलिसीमधून पैसे काढण्याच्या स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत

एलआयसीनुसार पॉलिसीधारकांना ईमेलद्वारे आपल्या क्लेमची रिक्वेस्ट पाठवावी लागेल.

>> यासाठी claims.bo<Branch code>@ licindia.comवर मेल करू शकतात. येथे ब्रँच कोड म्हणजे तुमची सर्विसिंग ब्रँच आहे. जर सोप्या शब्दात सांगायचे तर समजा तुमचा ब्रँच कोड ८८३ असेल तर मग आपल्याला [email protected] वर मेल पाठवावा लागेल.

>> याकरिता सर्व स्कॅन केलेली कागदपत्रे ही जेपीईजी किंवा पीडीएफ स्वरूपात असणे आवश्यक आहे. त्यांची साइज ही ५ एमबीपेक्षा जास्त नसावी.

>> अटॅचमेंटची साइज ही ५ एमबीपेक्षा जास्त असल्यास एकापेक्षा जास्त ईमेल पाठवावे लागतील. हा मेल आयडी फक्त क्लेमच्या गरजेसाठी पाठविला पाहिजे.

>> विमाधारकाला पॉलिसी चालू असल्यास आणि सर्व प्रीमियम भरले गेले असल्यासच मॅच्युरिटी बेनिफिटचा क्लेम करण्याचा हक्क असतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment