Paytm युझर्ससाठी मोठी बातमी ! आतापासून पेमेंटसाठी ‘हे’ शुल्क द्यावे लागणार नाही, कोणाकोणाला फायदा मिळणार हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर आपण देखील पेटीएम वापरत असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. पेटीएमने देशभरात पसरलेल्या कोरोना दरम्यान ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने म्हटले आहे की,”कोरोनाशी संबंधित सर्व कर्जात कोणतीही ट्रांजेक्शन फीस आकारली जाणार नाही.” कंपनीने घोषित केले आहे की, देशातील सर्व रजिस्टर्ड एनजीओना ट्रांजेक्शनसाठी 0% फीस द्यावी लागेल. पेटीएम पेमेंट गेटवे (Paytm Payment Gateway) सर्व्हिसवर ही सुविधा दिली जात आहे. या सुविधेमुळे पेमेंट देणे सोपे होईल, असे कंपनीने म्हटले आहे. या व्यतिरिक्त, कोरोना कालावधीत कोणताही व्यत्यय न आणता काम सुरळीतपणे सुरू राहिल.

पेमेंटमध्ये 400% वाढ
कंपनीने म्हटले आहे की,” ते देशभरातील रजिस्टर्ड एनजीओना पेमेंट गेटवे सर्व्हिस देत आहेत जे साथीच्या काळात लोकांना मदत करत आहेत. गेल्या कित्येक आठवड्यांत पेटीएम पेमेंट गेटवेच्या माध्यमातून एनजीओकडून दिलेल्या देणग्यात 400% वाढ झाली आहे. ते पाहता हे पाऊल उचलण्यात आले आहे.”

पेटीएम गेटवे म्हणजे काय ?
आपण या App द्वारे आपले वीज, पाणी आणि मोबाइल बिल्स ऑनलाईन भरल्यास हे फक्त गेटवेद्वारे केले जाते. याशिवाय गेटवेचा वापर कार्ड डिटेल्स भरण्यासाठीही केला जातो. याद्वारे ऑनलाइन पेमेंटची प्रक्रिया सुलभ होते. या व्यतिरिक्त, आपल्या डेबिट / क्रेडिट कार्डची माहिती ऑनलाइन कन्फर्मेशनसाठी पेमेंट गेटवेवर पाठविली जाते.

कंपनी लसीकरण स्लॉटची सुविधा देईल
या व्यतिरिक्त कंपनीने कोविड लसीकरण स्लॉट सर्च करण्याचे नवीन टूल Paytm Vaccine Slot Finder लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे की”पेटीएम वर, जेव्हा त्यांच्या क्षेत्रात लसीकरण करण्यासाठी नवीन स्लॉट उपलब्ध असतील तेव्हा युझर्सना अलर्ट मिळू शकेल.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment