व्यापाऱ्यांसाठी मोठी बातमी ! 2005 पासून आयातदार-निर्यातदार कोड अपडेट केले नसल्यास 6 ऑक्टोबरपासून Deactivate केले जातील

नवी दिल्ली । केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने 6 ऑक्टोबर 2021 पासून जानेवारी 2005 पासून अपडेट न केलेले सर्व आयात-निर्यातक कोड (IEC) निष्क्रिय (Deactivate) करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाऊल देशातील व्यापाऱ्यांची प्रत्यक्ष संख्या शोधण्यात मदत करेल. आयात-निर्यातकर्ता कोड हा एक प्रमुख व्यवसाय (Actual Traders) ओळख क्रमांक आहे, जो निर्यात किंवा आयात करण्यासाठी अनिवार्य आहे.

IEC क्रमांकाशिवाय आयात-निर्यात व्यवसाय करू शकत नाही
परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) दिलेल्या IEC क्रमांकाशिवाय कोणतीही व्यक्ती आयात किंवा निर्यात व्यवसाय करू शकत नाही. DGFT च्या व्यापार सूचनेनुसार, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने या वर्षी 8 ऑगस्ट रोजी सर्व IEC धारकांना त्यांचे तपशील प्रत्येक वर्षी एप्रिल-जून कालावधीत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अपडेट करण्यास सांगितले गेले होते. आता कोणतेही IEC कोड जे 1 जानेवारी 2005 नंतर अपडेट केलेले आढळले नाहीत ते 6 ऑक्टोबर 2021 पासून निष्क्रिय केले जातील.

व्यापाऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत शेवटची संधी दिली जात आहे
परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने सांगितले की,”IEC धारकांना 5 ऑक्टोबर 2021 पर्यंत त्यांचे IEC कोड अपडेट करण्याची शेवटची संधी दिली जात आहे. त्याचप्रमाणे, जर DGFT प्रादेशिक प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी सादर केलेले ऑनलाइन अपडेट अर्ज प्रलंबित असतील, तर त्यांचे आयईसी कोड निष्क्रिय करण्याच्या लिस्ट मधून वगळले जातील.”

You might also like