किसान क्रेडिट कार्डवर 31 ऑगस्टपर्यंतच लागू असेल 4% व्याज दर; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील 7कोटीहून अधिक किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बँकेकडून घेतलेले कृषी कर्जाची परतफेड करण्याची तारीख लक्षात ठेवा, अन्यथा ही चूक तुमच्या खिशावर भारी पडेल. जर शेतकऱ्यांनी केसीसीवर घेतलेले पैसे जर 41 दिवसांत परत केले नाहीत तर त्यांना 4 ऐवजी 7टक्के व्याज द्यावे लागेल. या शेतीच्या कर्जावर 31 ऑगस्टपर्यंत पैसे जमा करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. या तारखेच्या आतमध्ये पैसे जमा करण्यावर 4 टक्के व्याज आकारले जाईल, मात्र नंतर ते 7 टक्के दराने परत करावे लागेल.

सामान्यत: केसीसीवर घेतलेले कर्ज हे 31 मार्चपर्यंत परत करावे लागतात. परंतु लॉकडाऊनमुळे ते पुढे ढकलले गेले. सध्या, 31 ऑगस्टपर्यंत पैसे परत केल्यानंतर शेतकरी पुढच्या वर्षासाठी पुन्हा कर्ज घेऊ शकतात. ज्या शेतकऱ्यांना वेळेत पैसे जमा करायचे आहेत त्यांना व्याजात सवलत मिळू शकेल. दोन-चार दिवसांनंतर पुन्हा पैसे काढा. अशा प्रकारे तुमचा बँकेमधील रेकॉर्डही चांगला राहील आणि शेतीसाठी पैशांची कमतरता भासणार नाही.

लॉकडाऊन पाहता मोदी सरकारने ते 31 मार्च ते 31 मे पर्यंत वाढविले. नंतर ते 31 ऑगस्ट करण्यात आले. याचा अर्थ असा की, शेतकरी 31 ऑगस्ट पर्यंत केसीसी कार्डचे व्याज फक्त 4 टक्के या जुन्या दराने भरू शकतात. नंतर ते तीन टक्क्यांनी महाग होईल.

केसीसीवर किती व्याज आहे?
केसीसीवर शेती आणि शेतीसाठी घेतलेल्या तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा व्याज दर हा 9 टक्के आहे. पण त्यात सरकार 2 टक्के अनुदान देते. अशा प्रकारे तो 7 टक्क्यांपर्यंत खाली येतो. पण वेळेवर परत केल्यावर तुम्हाला 3% अधिक सूट मिळेल. अशा प्रकारे जागरूक शेतकऱ्यांसाठी याचा दर फक्त 4 टक्के आहे. सहसा बँका शेतकऱ्यांना माहिती देतात आणि 31 मार्चपर्यंत कर्ज परत करण्यास सांगतात. तोपर्यंत आपण बँकेला कर्ज दिले नाही, तर त्यांना 7 टक्के व्याज द्यावे लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment