नवी दिल्ली । पॉर्न पाहणाऱ्या शौकिनांना दातखिळी बसवणारी बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध पॉर्न वेबसाइटचा डेटा लीक झाला असून या पॉर्न वेबसाइटवरील युजर्सनेम, पासवर्ड, ईमेल अड्रेसची आता विक्री केली जात आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, हॅकर्स या डेटाचा वापर सायबर अटॅक किंवा त्या युजर्सना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जाऊ शकतो त्यामुळं पॉर्न पाहणारे अडचणीत सापडू शकतात.
Cyber News ने दिलेल्या वृत्तानुसार, MyFreeCams नावाच्या एका पॉर्न वेबसाईटचा डेटा लीक झाला आहे. लीक डेटामध्ये जवळपास 20 लाख युजरची माहिती आहे. यामध्ये युजरचा ईमेलआडी, आयपी अॅड्रेस, त्यांनी केलेले सर्च, युजरनेम आणि पासवर्ड सारखी खासगी माहिती आहे. आता ही माहिती ब्लॅक मार्केटमध्ये विकली जात आहे.
डेटाच्या बदल्यात बिटकॉइन
रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे की, युजर डेटाबेसला एका हॅकर्सच्या प्रसिद्ध फोरमवर विकले जात आहे. तसेच डेटाच्या बदल्यात बिटकॉइनची डिमांड केली जात आहे. १० हजार युजर्सच्या डेटाच्या बदल्यात १५०० डॉलर बिटकाइन म्हणून घेतले जात आहे. दावा करण्यात येत आहे की, १० हजार युजर्सचा डेटाला खरेदी करून कमीत कमी १० हजार डॉलर कमाई केली जाऊ शकते.
डेटा लीक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पॉर्न वेबसाईटने सांगितले की, युजरना सूचना देण्यात आली असून त्यांचे पासवर्डही रिसेट केले आहेत. ही वेबसाईट पॉप्युलर अॅडल्ट वेबसाईटच्या यादीत २७ व्या नंबरवर आहे. या वेबसाईटचे महिना ७ कोटी व्हिजिटर आहेत. महत्वाचे म्हणजे, हॅकर कोणत्याही प्रकारे या माहितीचा वापर करू शकतात. युजरला ब्लॅकमेल केले जाणारे ईमेल येऊ शकतात. ही माहिती मित्र, कुटुंबीय, समाजात व्हायरल केली जाण्याची शक्यता आहे. अशी धमकी ते देऊ शकतात. तसेच ईमेल आयडी फिशिंग किंवा स्पॅमसाठीही वापरला जाऊ शकतो.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’