Big News : कोविड रुग्णांसाठी हवाई मार्गाने ऑक्सिजन पुरवठा करा; मुख्यमंत्री ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदींशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या चर्चेद्वारे वाढीव ऑक्सिजनची मागणीही करण्यात आली. त्यानुसार सर्वच यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या राज्यांतून ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा करण्यासाठीही प्रयत्न सुरू झाली आहे. रस्त्यावरून ऑक्सिजन आणण अवघड असल्याने हवाई मार्गाने ऑक्सिजनचा पुरवठा लष्कराच्या मदतीने करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. राज्याला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते.

राज्यातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन त्यांच्यासोबत दीर्घकाळ चर्चा केली. मात्र आता चर्चेने मार्ग सुटणार नाही. काहीतरी उपाययोजना करावीच लागणार आहे. राज्यातील ऑक्सिजन उत्पादनाची मर्यादाही कोविड लोकांसाठी कमी पडत आहे. रेमडिसिव्हरची मागणी आणि पुरवठा यातील तफावत मागील काही काळात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रेमडिसिव्हरच्या नियमनासाठी २ आठवड्यांचा कालावधी लागत असल्याने ते मिळण्यासाठी थोडं थांबावं लागणार आहे.

कोरोना रुग्णांचा वाढता आकडा हा धडकी भरवणारा आहे. सोमवारी ६० हजार २१२ नवीन रुग्णांची राज्यात वाढ झाली, हे निश्चितच धोकादायक आहे. मागील वर्षभरात आरोग्य यंत्रणा बऱ्यापैकी सुधारली असली तरीसुद्धा त्याच्यावर पडणारा भार हा जास्त आहे. चाचण्या केल्यानंतरही त्याचे रिपोर्ट्स वेळेवर मिळत नाहीत. बेड्सची संख्या वाढवली तरीसुद्धा बेडस अपुरे पडत आहेत. या सुविधांवर येणारा भार जास्त असल्याने दहावी, बारावी आणि MPSC च्या परीक्षाही पुढे ढकलाव्या लागल्या.

You might also like