Wednesday, October 5, 2022

Buy now

मोठा दिलासा : सातारा जिल्ह्यात केवळ 47 कोरोना पाॅझिटीव्ह

सातारा | सातारा जिल्ह्यात काल रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये केवळ 47 बाधित आढळले आहेत. कोरोना बाधितांचा आकडा सर्वात कमी आला आहे. त्यामुळे जिल्ह्याला कोरोना बाधित तपासणीच्या अहवालात दिलासा मिळाला आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 2 हजार 936 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 47 लोक बाधित आढळून आले आहेत. तपासणीत केवळ 1. 6 टक्के पॉझिटिव्ह रेट आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. आज बाधितांचा आलेला आकडा जिल्हावासियासाठी दिलासादायक बातमी आहे. त्यामुळे हळूहळू जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आज 1 हजार 400 कोरोना रूग्ण विविध रूग्णालयात उपचार्थ दाखल आहेत.

सातारा जिल्ह्याची काल रात्रीपर्यंतची स्थिती

एकूण नमूने – 21 लाख 77 हजार 543
एकूण बाधित – 2 लाख 50 हजार 501
घरी सोडण्यात आलेले – 2 लाख 41 हजार 885
मृत्यू –6 हजार 384
उपचारार्थ रुग्ण– 1 हजार 353 (आज 47 बाधित आल्याने आज 1400 रूग्ण उपचार्थ आहेत)