पानदरीबागेत चोरट्यांची धाडसी चोरी; दोन ते अडीच लाखांचे साहित्य लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – आज सकाळी अडीच ते तीन च्या दरम्यान प्रणव प्रमोद मेहता यांच्या पुष्कर स्मार्ट प्लांट या दुकानात चोरट्यांनी दुकानाचे अर्धे सेटर वरती करून, दुकानातील महागडे मोबाईल ब्रँडेड हेडफोन असे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलीस सीसीटीव्ही चेक करत असताना चोरट्याने याअगोदरही दोन दिवसांपूर्वी चोरी केली होती. आपण सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे हे लक्षात आल्यावर चोरट्यांनी सीसीटीव्ही बंद कले. त्यानंतर चोरट्याने दोन लाख 45 हजाराच्या साहित्य चोरटा घेऊन पसार झाला.

याच परिसरामध्ये अजून दोन ते तीन दुकानात चोरी झाल्याची पोलिसांकडून माहिती मिळत आहे चोरी करणारा चोर सराईत असल्याची माहिती मिळते.

Leave a Comment