Big Saving Days Sale | भारतामध्ये सध्या अनेक ई-कॉमर्स कंपनी उदयास आलेल्या आहेत. त्यात फ्लिपकार्टने त्याचे एक वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. अशातच फ्लिपकार्टने त्यांच्या बिग सेविंग सेलची घोषणा केलेली आहे. त्यामुळे येथे 3 मे 2024 पासून flipkart चा हा सेल सुरू होणार आहे. या सेलमध्ये टीव्ही, होम अप्लायन्सेस अशा विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अत्यंत सवलतीच्या दरात ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.
या सेलची माहिती सगळ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी आता फ्लिपकार्टने आयफोन 14 आणि आयफोन 12 याच्या किमती देखील कमी केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर आता या उन्हाळ्यामध्ये नवीन स्मार्टफोन टीव्ही किंवा इलेक्ट्रिक वस्तू घेण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टमध्ये खरेदी करून तुमची खूप जास्त सेविंग होऊ शकते.
आयफोन 14 किंमत |Big Saving Days Sale
फ्लिपकार्ट बिग सेविंग डीलमध्ये (Big Saving Days sale) अर्ली सेलमध्ये आयफोन 14 मॉडेल्सवर 128 जीबीसह सवलतीच्या किमतीच्या देखील ऑफर आहे. त्याचप्रमाणे आयफोन 14 ची किंमत ही 69 हजार 999 रुपये एवढी आहे. या सेल्स दरम्यान हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ 55 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. म्हणजेच आयफोन 14 च्या खरेदीवर ग्राहकांना 19% सूट मिळणार आहे.
यासोबतच खरेदी जणांना बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. ज्यामुळे स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होणार आहे. सिटी ब्रांडेड क्रेडिट कार्डच्या ईएमआय ट्रांजेक्शनवर ग्राहकांना दीड हजार रुपयांच्या ईएमआय ट्रांजेक्शनवर 5 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त ऑर्डरवर दहा टक्के सूट मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जर आयफोन 14 खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला हा मोबाईल केवळ 41 हजारापर्यंत सूट मिळेल.
आयफोन 12 किंमत | Big Saving Days sale
फ्लिपकार्टच्या या सेलदरम्यान तुम्हाला आयफोन 12 केवळ 40 हजार 999 च्या किमतीत मिळेल. हा iphone 12 ची मूळ किंमत 17% कमी होणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला बँक सवलत देखील दिली जात आहे. तुम्ही आयफोन 12 च्या खरेदीदारांना सिटी ब्रांडेड क्रेडिट कार्ड दीड हजार रुपयांपर्यंत ईएमआय व्यवहारांवर 5 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त ऑर्डरवर 10 टक्के सूट दिली जाते. त्यामुळे तुम्ही देखील आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. तुम्ही फ्लिपकार्टच्या या सेविंग डेज सेलमध्ये आयफोन खरेदी करून मोठी बचत करू शकता.