Saturday, June 3, 2023

पोर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांना मोठे यश, राज कुंद्राचे चार कर्मचारी सरकारी साक्षीदार बनण्यास तयार

मुंबई । पोर्नोग्राफी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतश्या राज कुंद्राच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. पॉर्न व्हिडिओ आणि चित्रपट बनवण्याच्या बाबतीत गुन्हे शाखेच्या (मुंबई क्राइम ब्रँच) प्रॉपर्टी सेलने मोठे यश मिळवले आहे. राज कुंद्राचे स्वत: चे चार कर्मचारी आता सरकारी साक्षीदार बनण्यास तयार आहेत. सरकारी साक्षीदार बनून ते पोर्नोग्राफीचा हा घाणेरडा व्यवसाय उघडकीस आणण्यात पोलिसांना मदत करतील.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चौघांनी गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलसमोर अनेक रहस्ये उघड केली आहेत. हे संपूर्ण रॅकेट कसे चालायचे हे त्यांनी सांगितले आहे.

या चार कर्मचार्‍यांकडून राज कुंद्राच्या बिझनेस डील्सविषयी गुन्हे शाखा पुढील माहिती घेईल. पोर्नोग्राफीचे रॅकेट कसे चालले होते, फायनान्शिअल डील्स आणि इतर गोष्टीदेखील शोधल्या जातील. राज कुंद्रा पैशाचे मॅनेजमेंट कसा करतो याचाही शोध घेण्याचा प्रयत्न गुन्हे शाखा करीत आहे.