नीरव मोदी प्रकरणात मोठे यश! फरार हिरे व्यापाऱ्याला भारतास सोपवले जाणार; ब्रिटनच्या कोर्टाचा आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंजाब नॅशनल बँकेच्या 14,000 कोटी रुपयांच्या फसवणूकी प्रकरणात भारताला मोठे यश मिळाले आहे. ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी कोर्टाने या प्रकरणातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला भारतात प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने नीरव मोदी याला पुरावे नष्ट करण्याचे षडयंत्र रचणे आणि साक्षीदारांना धमकावणे या प्रकरणात दोषी ठरवले. यावेळी कोर्टाने असे म्हटले की,”भारतातील एका खटल्याबाबत त्याला उत्तर द्यावे लागेल.”

नीरव मोदी याला ब्रिटनच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमधून 13 मार्च 2019 रोजी अटक केली होती. तेव्हापासून तो दक्षिण पश्चिम लंडनच्या वॅन्ड्सवर्थ कारागृहात बंद आहे. त्याच्या विरोधात प्रत्यार्पणाच्या आदेशाला नीरवने कोर्टात आव्हान दिले होते. दोन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर जिल्हा न्यायाधीश सॅम्युएल गूजी यांनी असा निकाल दिला कि,” नीरवविरोधात कायदेशीर खटला चालू आहे, ज्यासाठी त्याला भारतीय न्यायालयात हजर राहावे लागेल”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment