Thursday, October 6, 2022

Buy now

गोरखपूर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांचा मोठा विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मतदार संघातून विजय मिळवला आहे. आदित्यनाथ यांनी तब्बल १ लाख २ हजार मतांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे योगीनी प्रथमच विधानसभा निवडणूक लढवली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवार सुभावती शुक्ला यांचा एक लाख दोन हजार 399 मतांनी पराभव केला. यावेळी अन्य उमेदवार असलेले भीम आर्मीचे चंद्रशेखर तसेच काँग्रेस आणि बसपाचे उमेदवार स्पर्धेतही दिसले नाहीत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक लाख 62,691, सपाच्या सुभाती शुक्ला यांना 60,562, बसपाच्या शमसुद्दीन 7833, आझाद समाज पक्षाचे चंद्रशेखर 7454, काँग्रेसच्या चेतना 2731, आम आदमी पक्षाच्या विजय श्रीवास्तव यांना 081 मते मिळाली आहेत.

दरम्यान, भाजपचे उत्तर प्रदेशात दमदार विजय मिळवत आपली सत्ता राखली आहे. भाजपला समाजवादी पक्षाचे कडवे आव्हान होते. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या झंझावाती प्रचाराचा भाजपला थेट फायदा झाला. भाजप २७० हुन अधिक जागांवर आघाडीवर असून पुन्हा एकदा उत्तरप्रदेशात एकहाती सत्ता काबीज केली आहे.