बर्थडे पार्टी आली अंगाशी; इगतपुरी ‘रेव्ह पार्टी’ प्रकरणात ‘बिग बॉस मराठी २’ फेम हिना पांचाळला अटक

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी २’ फेम अभिनेत्री हीना पांचाळ हिला पोलिसांनी एका रेव्ह पार्टीत अटक केली आहे. नाशिकमधील इगतपुरी येथे हाय प्रोफाईल लोकांच्या जमाव पार्टीवर पोलिसांनी माहिती मिळताच छापा टाकला होता. या पार्टीदरम्यान एकूण २२ व्यक्ती ड्रग्ज, कोकेन, गांजा या सारख्या अमली पदार्थांचे सेवन करताना सापडले. यात २२ जणांचा समावेश होता. मुख्य बाब अशी कि, अटक करण्यात आलेल्यांत बॉलिवुड क्षेत्रातील २ कोरिओग्राफरसह तामिळ आणि हिंदी चित्रपटांत काम केलेल्या अभिनेत्रींचा समावेश आहे. तर एका रिअॅलिटी – शोमधील अभिनेत्रीचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली होती. यानंतर आता अशी माहिती समोर येत आहे कि, रिअॅलिटी शो अर्थात बिग बॉस मराठी २ मधील अभिनेत्री हिना पांचाळ हिला अटक झाली आहे.

 

विनापरवाना अंमली पदार्थ बाळगणे व त्याचे सामूहिकपणे सेवन करणे आणि कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करत एकत्र येऊन गर्दी जमविल्याप्रकरणी विविध कलमान्वये संबंधितांविरुध्द इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मुख्यत्वे १० पुरुष, १२ महिलांसह एकुण २२ उच्चभ्रू व्यक्तींचा समावेश आहे. इगतपुरी येथील स्काय ताज व्हिला व स्काय लगून व्हिला या आलिशान बंगल्यांमध्ये रेव्ह पार्टी करताना हे पोलिसांना सापडले. यामध्ये काही महिला थेट बॉलिवुडशी संबंधित आहेत तर एका विदेशी महिलेचाही समावेश आहे. ही महिला इराणची नागरिक असल्याचे अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

 

या प्रकरणात अटक झालेली अभिनेत्री हीना पांचाळ ही ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ट एन्ट्री घेऊन स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. मात्र अंतिम टप्प्याआधीच हिनाचे बिग बॉसच्या घरातून गेट आऊट झाले. मिळालेल्या माहितीनुसार हि पार्टी अभिनेत्री हिना पांचाळच्या वाढदिवसाची होती. यामुळे तिच्या या पार्टीत तिचे मित्रमंडळी सामील होते. यात पियुष शेट्टी, अमित लत, आशिष लत, राज त्रिवेदी, विशाल मेहता , नीरज सुराणा, रोहित अरोरा, हर्ष शाह, डॅनिश खान, अबू बकर, हनीफ शेख, सर्वा राहनार,आरव शर्मा, विशाल मेहता, रोहित अरोरा, अकिब खान, वरून बाफना, करिष्मा, चांदनी भाटिया, श्रुती शेट्टी, रुचिरा नार्वेकर, विदेशी महिला – अझहर फरनुद, शनाया कौर, अशिता शीना, प्रीती चौधरी, कौशिकी आणि हिना पांचाळ यांचा समावेश होता आणि या सर्वाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या छाप्यात पोलिसांनी मोठ्या रखमेसह, कॅमेराज आणि ट्रायपॉड आणि अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे.

You might also like