गुजरात मध्ये सर्वात मोठा बँक घोटाळा; 22 हजार कोटींना गंडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा बँकिंग घोटाळा गुजरात मध्ये झाला आहे.. हा घोटाळा एका शिपयार्ड कंपनीचा असून या कंपनीने 28 बँकांना 22 हजार कोटींचा गंड घातल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात एबीजी शिपयार्डच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने गुन्हा दाखल केला आहे

ABG शिपयार्ड ही कंपनी जहाजाची निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचे काम करते. या कंपनीचे शिपयार्ड गुजरातमधील दहेज आणि सूरत येथे आहेत. ABG शिपयार्ड कंपनीच्या एकूण आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, हा घोटाळा एप्रिल 2012 ते जुलै 2017 यादरम्यान झाला आहे. सीबीआयद्वारे दाखल करण्यात आलेला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जातेय

एबीजी शिपयार्ड कंपनीने सर्व नियम तोडत अनेक बँकांमध्ये फसवणूक केली आहे. फक्त बँकच नाही तर एलआयसीलाही चूना लावला आहे. एएफआयआरनुसार, एबीजी शिपयार्डने एलआयसीची 136 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तर एसबीआयला  2468 कोटी रुपयांचा चुना लावला आहे

एबीजी शिपयार्डवर सध्या एसबीआयचं 2 हजार 925कोटी, आयसीआयसीआय बँकेचं 7 हजार 089 कोटी, आयडीबीआयचं 4 हजार 634 कोटी, बँक ऑफ बडोदाचं 1 हजार 614 कोटी, पीएनबीचं 1हजार 244 कोटी आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचं 1हजार 228 कोटी रुपयांचं कर्ज आहे.

कंपनीचे माजी अध्यक्ष-महासंचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतर अधिकाऱ्यांवर सीबीआयने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिवसभर या कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयकडून छापेमारी सुरू होती. हा आत्तापर्यंत उघड झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यापैकी एक मानला जात आहे.