प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी प्रेयसीने स्वत:वर घडवून आणला अ‍ॅसिड हल्ला आणि मग…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या नालंदा जिल्ह्यामध्ये एक अजब घटना उघडकीस आली आहे. यामध्ये घरच्यांनी प्रियकरासोबत लग्न लावून द्यावं म्हणून प्रेयसी आणि प्रियकराने अनोखे पाऊल उचलले आहे. प्रेयसीने स्वत:वर अ‍ॅसिड हल्ला घडवून आणला, जेणेकरून घरातील लोक तिचं लग्न प्रियकरासोबत लावून देतील. नालंदातील सर्किट हाऊसजवळ दिवसाढवळ्या झालेल्या या अ‍ॅसिड अटॅकमध्ये पोलिसांनी २४ तासांच्या आत या प्रकरणाचा उलगडा केला. यामध्ये पोलिसांनी तरूणीच्या प्रियकरासहीत 5 जणांना अटक केली आहे.

तरूणीचं साजन कुमार नावाच्या तरूणासोबत गेल्या ७ वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं. पण तरूणीच्या घरातील लोकांचा दोघांच्या लग्नाला विरोध होता. यामुळे तरूणी आणि तिच्या प्रियकराने असा प्लॅन केला की, जर अ‍ॅसिडने शरीराचा काही भाग भाजला तर तरूणीच्या परिवारातील लोक त्यांच्या लग्नासाठी परवानगी देतील. यानंतर 18 ऑगस्टला साजनने त्याच्या तीन चुलत भावांसहीत 4 तरूणांना पटण्यातील आलागंजमध्ये बोलवलं आणि त्यानंतर ही घटना घडवून आणली.

घटनेच्या दिवशी सावज स्वत: तरूणीसोबत फिरत होता. आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्ट दिसत आहे की, दोन तरूणींसोबत तो एका भागात फिरत आहे. अशात दोन तरुण त्यांच्या विरूद्ध दिशेने एका भांड्यात अ‍ॅसिड घेऊन आले आणि तरूणीवर फेकून फरार झाले. याअगोदर हे तरुण तरुणी २०१७ मध्ये घरातून पळूनसुद्धा गेले होते पण परिवाराच्या दबावामुळे त्यांना परत घरी यावे लागले. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तरूणीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

You might also like