संतापजनक ! बहिणीच्या दीराकडून लैंगिक शोषण, मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एक महिलेने पतीच्या अत्याचाराला कंटाळून पटणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिने आपल्या तक्रारीत पतीने तिला त्याच्या मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडले होते.

अश्लील फोटो काढून केलं ब्लॅकमेल
काही वर्षांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलगी बहिणीच्या सासरी गेली होती. तिथे बहिणीच्या दिराने तिचे लैंगिक शोषण केले आणि तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढले. यानंतर देखील तो पीडितेला सतत ब्लॅकमेल करत होता. जेव्हा पीडित आपल्या घरी परतली तेव्हादेखील हा आरोपी पीडितेला त्रास देत होता.

तरूणीच्या होणाऱ्या पतीला पाठवले आक्षेपार्ह फोटो
काही वर्षांनंतर पीडितेच्या कुटुंबियांनी तिचे लग्न एका ठिकाणी जुळवले आले होते. यानंतर आरोपीने तिच्या सासरच्या लोकांना तिचे आक्षेपार्ह फोटो पाठवून तिचे लग्न मोडले. यानंतर त्या तरुणीचे आरोपी तरूणासोबतच लावून देण्यात आले. यानंतर आरोपीने आपल्या पत्नीला पुन्हा त्रास देण्यास सुरूवात केली. तो तरूणीला हुंड्यसाठी त्रास देत होता. तिला अनेकदा त्याने मारहाणदेखील केली. अखेर या सगळ्या जाचाला कंटाळून पीडितेच्या वडिलांनी आरोपीला काही पैसे दिले पण तो काही ऐकायला तयार नव्हता .

तरूणीचा अश्लील व्हिडीओ
आरोपी तरुण एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने तरूणीचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ काढला आणि तिला आपल्या मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. यामुळे पीडितेला चांगलाच धक्का बसला. या सगळ्याला वैतागून तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली. जेव्हा या पीडितेवर बलात्कार झाला तेव्हा तिचे वय १८ वर्षांपेक्षा कमी होते. त्यामुळे आरोपी विरोधात पॉक्सो अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपी पती रणज्योति कुमार याला अटक केली आहे.

You might also like