मिरज – पंढरपूर मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले : मोटारसायकलस्वार ठार तर दोघे गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
मिरज पंढरपूर मार्गावर शिरढोण गावानजिक भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला पाठीमागून ठोकरून झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला तर दोन जन गंभीर जखमी झाले. जखमीत ९ वर्षे वयाच्या बालकाचा समावेश आहे. हा अपघात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास झाला.

हाती मिळालेल्या माहितीनुसार सदर ट्रक हा मिरजेहून पंढरपूरकडे जात होतता तर मोटारसायकल मिरजेहून ढालगांवकडे जात होती. ढालगांव येथे इस्तेमासाठी जात असता ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात तोशीफ बाणदार हे जागीच ठार झाले तर अमिन सलाती व हुजेफ बाणदार दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना मिरज येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मोकळा ट्रक समोरील ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत होता. ट्रकचे ड्रायव्हरच्या बाजूचे चाक मयत तोशीफ यांच्या अंगावरून जावून पाठीमागील चाका पर्यंत मोटारसायकल जावून अडकली होती.

ट्रक शिरढोण येथील असून ट्रक मालकाचे नाव समजले नाही. ट्रक ड्रायव्हर हा अपघातानंतर पळून गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिरढोणचे सरपंच अशोक मंडले यांनी अपघाताची माहिती पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक ए.एस.कोळी करित आहेत.

Leave a Comment