Bike Parcel in Train : तुम्ही रेल्वे मधून बाईक नेणार असाल तर तुम्हाला किती चार्जेस द्यावे लागतील ? यासाठी रेल्वेची काय प्रक्रिया आहे ? या सगळ्याबाबतची माहिती या आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. भारतीय रेल्वे मधून बाईक तुम्ही नेणार असाल तर अतिशय नाममात्र चार्जेस तुम्हाला द्यावे लागतात. यामुळे तुमच्या इंधनाची आणि पर्यायाने पैशाचीही बचत होणार आहे. शिवाय रेल्वेचे जाळे भरतभर पसरले आहे.
सायकल रेल्वेमधून न्यायची असल्यास
प्रवासी त्यांच्या सायकली लोकल ट्रेनमध्ये (Bike Parcel In Train) सहजपणे आणू शकतात यासाठी तुम्हाला 200/- रुपयांची पावती डिपार्चर स्टेशनवरील चेकिंग किंवा बुकिंग कर्मचाऱ्यांकडून करून घ्यावी लागेल. तुमची सायकल लगेज च्या डब्यातून आणले जाईल.
रेल्वेतून दुचाकी नेण्यासाठी कागदपत्रे
रेल्वे मार्गे (Bike Parcel In Train) दुचाकी न्यायाची असल्यास तुमच्या गाडीचे आरसी आणि विम्याची कागदपत्रे सोबत घेऊन जावी लागतात. शिवाय तुमच्या एखाद्य ओळखपत्राची सुद्धा आवश्यकता असते (आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स, वोटर आयडी इ. )
काय असते प्रक्रिया ? (Bike Parcel In Train)
तुम्हाला जर रेल्वेतून प्रवास करत असताना लगेज म्हणून बाईक न्यायाची असेल तर त्यासाठी तुम्हाला एक पावती करावी लागेल. तुमची बाईक व्यवस्थित पॅक करावी लागेल आणि त्याचं बिल तुम्हाला रेल्वे कडून दिलं जातं. जेव्हा तुम्ही निश्चित स्थळावर पोहचाल तेव्हा तुम्ही हे बिल आणि तुमचं ट्रेनचं तिकीट जर दाखवले तर तुम्हाला ज्या ठिकाणी उतरायचं आहे त्या ठिकाणी ती बाईक मिळून जाते. हे करीत असताना बाईकच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटच्या दोन झेरॉक्स पार्सल कार्यालयात जमा करावे लागतात पेट्रोलची टाकी पूर्णपणे रिकामी करावी लागते
दुसरीकडे केवळ बाईक रेल्वेतून (Bike Parcel In Train) आणायचीअसल्यास प्रक्रिया करता बाईकच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटच्या दोन झेरॉक्स पार्सल कार्यालयात जमा करावे लागतात पेट्रोलची टाकी पूर्णपणे रिकामी करावी लागते. बाईक पाठवताना एक कार्डबोर्ड बाईकवर बांधावा लागेल त्यावर बोर्डिंग स्टेशन डेस्टिनेशन च नाव स्पष्टपणे लिहायला लागेल आणि त्यानंतर तुमची बाईक हे दुसऱ्या शहरात पाठवले जाईल. जेव्हा तुम्ही त्या बाईक सोबत प्रवास करत नसाल तेव्हाची ही गोष्ट आहे. ही दुसरी पद्धत आजमावत असताना तुम्हाला एक फॉर्म मिळेल त्यावर तुम्हाला बाईकचे पूर्ण तपशील भरावे लागतील बाईकची कंपनी, नोंदणी क्रमांक बोर्डिंग स्टेशन आणि डेस्टिनेशन स्टेशनची माहितीही त्या फॉर्ममध्ये भरावी लागते.
किती येतो खर्च ?
आता जर पैशांचा विचार केला तर प्रत्येक ट्रेनचे (Bike Parcel In Train) हे चार्जेस वेगवेगते असतात. शिवाय तुमच्या बाईकचे वजन किती आहे यावरही त्याचा शुल्क अवलंबून असतो. समजा मुंबईवरून पुण्याला बाईक पाठवायची असेल तर साधारण चारशे रुपये खर्च तुम्हाला ट्रेन द्वारे नेण्यातर साठी येऊ शकतो.