New Shoe Bite Treatment : नव्या चप्पलमूळे पायाला जखमा, चालणेही झाले मुश्किल?; ‘या’ टिप्स वापरल्यास मिळेल आराम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Shoe Bite Treatment) वेगवेगळ्या ड्रेसवर वेगवेगळी चप्पल पेअर करायला सगळ्यांनाचं आवडतं. पण नव्या चप्पल किंवा शूजमुळे होणाऱ्या जखमा कुणालाही असह्यचं असतात. नवीन चप्पल किंवा शूज घालून चालल्यामुळे पायाच्या मागे किंवा बोटांवर पाण्याचे फोड येतात. तीच चप्पल पुन्हा वापरली असता हे फोड फुटून जखमा होतात आणि या जखमांमुळे चालणेही मुश्किल होऊन जाते. पुढे जाऊन या जखमांचे डाग पडतात आणि पाय निस्तेज दिसू लागतात. त्यामुळे जर नवीन चप्पलमुळे पायाला फोड येत असतील तर दुखापतीशी झगडण्यापेक्षा योग्य उपचार करा आणि आराम मिळावा.

अनेकांना घरगुती सोप्या ट्रिक्स माहित नसल्यामुळे त्यांना नवीन चप्पलमुळे होणारा त्रास सहन करावा लागतो. पण आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही पायावरील फोड बरे करू शकता. इतकंच काय तर, फोड फुटल्याने झालेली जखम सुद्धा बरी करू शकता. या टिप्सचा वापर केल्याने तुमच्या पायांवर शु बाईटचे डागसुद्धा दिसणार नाहीत. चला तर जाणून घेऊयात.

शु बाईटचे फोड ‘असे’ बरे करा (New Shoe Bite Treatment)

1) खोबरेल तेल आणि कापूर – नव्या चप्पलमुळे पायावर फोड आले तर खोबरेल तेलात कापूरची एखादी वडी मिसळून जखमेवर लावा. यामुळे जखम लवकर भरून येते आणि खाजदेखील येत नाही.

2) मधाचा वापर – नव्या चप्पलचा वापर केल्याने होणाऱ्या जखमांवर मध लावल्याने जळजळ थांबते आणि काही वेळाने आराम पडतो. मधातील अँटी- बॅक्टेरिअल गुणधर्म जखम भरून यायला मदत करतात. याशिवाय तुम्ही थोडे मध घेऊन कोमट पाण्यात मिसळून पायाची मालिशदेखील करू शकता. यामुळेदेखील आराम मिळतो. (New Shoe Bite Treatment)

3) हळदी पावडर – हळदीमध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म असतात. ज्यामुळे कोणत्याही जखमेचं सेप्टिक होऊ नये म्हणून हळद फायदेशीर भूमिका निभावते. त्यामुळे नव्या शूजमुळे पायाला जखम झाल्यास त्यावर हळद लावा. यामुळे तुमची जखम लवकर येईल आणि सूजदेखील येणार नाही.

4) बर्फाचा शेक – (New Shoe Bite Treatment) नवीन चपलांच्या वापरामुळे जर पायांना दुखापत झाली असेल किंवा जखमेमुळे सूज आली असेल तर बर्फाने शेक देणे कधीही फायदेशीर ठरते. बर्फामध्ये जखम झालेला भाग सुन्न करून वेदना कमी करण्याची क्षमता असते. शिवाय यामुळे उद्भवलेली सूज सुद्धा कमी होते.

5) कोरफडीचा गर – नव्या चप्पल किंवा शूजच्या वापराने पायांना झालेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी कोरफडीचा गर बराच फायदेशीर ठरतो. जखम झालेल्या भागावर कोरफडीचा ताजा गर लावल्याने तात्काळ वेदना कमी होतात. शिवाय दीर्घकाळ वापर केल्यामुळे जखमांनी झालेले डाग कमी होण्यास मदत होते.

6) डॉक्टरांचा सल्ला – नव्या शूजचा वापर केल्याने तुमच्या पायाला जर मोठी जखम झाली असेल किंवा छोटी जखम चिघळली असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जा. अशावेळी पायाला सेप्टिक होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. शिवाय डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेत घेणे आणि अँटी सेप्टिक क्रीम जखमेवर नियमितपणे लावणे ही तुमची वैयक्तिक जबाबदारी राहील. (New Shoe Bite Treatment)

नवीन चप्पल वापरण्यापूर्वी ‘या’ गोष्टी केल्यास जखमा होणार नाहीत

नव्या चप्पलमूळे जर तुमचे पाय सोलपटत असतील तर नवी चप्पल वापरण्यापूर्वी तिला आतुर खोबरेल तेलाचे कोटिंग करा. यामुळे चप्पलचा कडक भाग नरम पडेल आणि तुमच्या पायांना जखम होणार नाही.

नवीन चप्पल वापरण्यापूर्वी जिथे त्वचेला त्रास होत असेल तिथे आधीच पट्टी लावा. ज्यामुळे फोड येणे किंवा जखम होण्यापासून बचाव होईल.

(New Shoe Bite Treatment) तसेच शूज किंवा चप्पलमुळे पायाची बोटं दुखत असतील तर त्या जागी कापूस घाला. यामुळे या बोटांना आराम मिळेल.