दुचाकी चोरीचे सत्र सुरूच! आणखी चार दुचाकी लांबवल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. वाहनधारकांनसोबतच पोलिसांची सुद्धा या घटनेमुळे डोकेदुखी वाढली आहे. शहराच्या विविध भागातून चार दुचाकी चोरीला गेल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. शहरामध्ये वाहन चोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

औरंगाबाद शहरातून आतापर्यंत शेकडो दुचाकी चोरीला गेले आहे.त त्याच कंपन्या समोरून, पार्किंगमधून आणि घरासमोरून दुचाकीला लांबवले आहेत. त्यातील मोजक्याच दुचाकींचा तपास लागू शकला. गेल्या आठ दिवसात चोरांनी आणखी दोघांची दुचाकी लांबले आहेत. विशेष म्हणजे या दुचाकी मध्यरात्री चोरीला गेल्या आहेत.

राम श्रीधर कुलकर्णी (रा. वाळूज) यांची 29 जुलै रोजी रात्री घरासमोर उभी असलेली दुचाकी (एमएच -20 डिडब्ल्यू- 7398) चोरट्यांनी पळवली. तुकाराम सोनटक्के (रा. गारखेडा परिसर) यांची दुचाकी (एमएच-20 ईसी – 0098) 26 जुलै रोजी शिवाजी नगरातील एका इलेक्ट्रिक दुकानासमोर उभी केली होती ती चोरीला गेली. गणेश पुंडलिक पैठणकर (रा. राजनगर, मुकुंदनगर) यांची दुचाकी (एमएच 20 बीएच 3502) ही 20 जुलै मुकुंदवाडी रेल्वे रुळाजवळून पळवली. सुमित गायकवाड (रा. समतानगर) यांची दुचाकी (एमएच-20 एक्स-4 11) ही 25 जुलै रोजी घरासमोरून चोरट्यांनी नेली. या प्रकरणी त्या-त्या पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

Leave a Comment