Tuesday, June 6, 2023

बिल गेट्स म्हणाले,” कोरोना कालावधीनंतर बदलणार व्यवसाय करण्याची पद्धत”

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस महामारी (Coronavirus Pandemic) ने आपल्या ऑफिस मध्ये काम करण्यापासून ते बिझनेस ट्रॅव्हलच्या च्या पद्धतीमध्ये मोठा बदल करण्यास भाग पाडले आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स म्हणतात की, ही महामारी संपल्यानंतरही परिस्थिती पहिल्यासारखी होणार नाही. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका परिषदेत मुलाखती दरम्यान गेट्स म्हणाले की,” भविष्यात काम करण्याचा मार्ग पूर्णपणे बदलला आहे. गेट्स यांच्या मते, सर्वात मोठा बदल कामाच्या पद्धती आणि बिझनेस ट्रॅव्हलबद्दल असेल.

गेट्स म्हणाले, “माझा अंदाज आहे की, बिझनेस ट्रॅव्हल 50% तर कार्यालयीन वेळेत 30% कमी होईल.” गेट्स पुढे म्हणाले की, बिझनेसच्या प्रस्तावावर बोलणी करण्यासाठी फिजिकल स्वरुपात समोरासमोर बसणे आता ‘गोल्ड स्टॅंडर्ड’ ठरणार नाही. कंपन्या यापुढे अशा बिझनेस ट्रिपसाठी तयार होणार नाहीत.

घरातूनच काम करण्याच्या (Work From Home) सध्याच्या नव्या ट्रेंडबाबत, गेट्सचा यांचा असा विश्वास आहे की, काही कंपन्या यापैकी फक्त एकच पर्याय निवडण्यास प्राधान्य देतील. त्याने ट्विटरचेही उदाहरण दिले. अलीकडेच ट्विटरने म्हटले आहे की, ‘त्यांचे कर्मचारी कायमचे कोठूनही काम करू शकतात.’

व्हर्च्युअल मीटिंग्जची फ्लिप साइड काय असेल?
तथापि, गेट्सने या आभासी बैठकीतील (Virtual Meetings) इतर पैलूंचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले की, व्हर्च्युअल मीटिंग्जमध्ये एखाद्याला ओळखण्याची शक्यता कमी होईल. या मुलाखतीत त्यांनी असेही म्हटले आहे की, यावर्षी नवीन मित्र बनविण्याची संधी मिळाली नाही. व्हर्च्युअल मीटिंगसाठी वापरल्या गेलेल्या सॉफ्टवेअरमध्येही मोठे बदल करण्याची गरज आहे.

कंपन्या कामासाठी नवीन मार्ग शोधत आहेत
विशेष म्हणजे बर्‍याच कंपन्या (विशेषत: टेक क्षेत्रातील कंपन्या) भविष्यात काम करण्याचे मार्ग शोधत आहेत. यावर्षी कोविड -१९ या साथीच्या आजारामुळे या कंपन्यांना त्यांच्या कार्यशैलीत मोठे बदल करावे लागले. ट्विटर ही एकमेव कंपनी नाही जी आपल्या कर्मचार्‍यांना कोठूनही काम करण्याची संधी देते आहे.

मायक्रोसॉफ्ट हाइब्रिड वर्कप्लेसकडे वाटचाल करीत आहे
Slack, Stripe आणि Facebook सारख्या कंपन्यांनी सांगितले की, त्यांचे कर्मचारी हेडक्वॉटर मधून रिलोकेट होऊ शकतात. मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे की, त्यांचे कर्मचारी ‘हायब्रीड वर्क प्लेस’ मॉडेलकडे जातील. त्याअंतर्गत त्यांना आठवड्यातून केवळ अर्धा दिवसच काम करावे लागेल. उर्वरित दिवस, ते कोठूनही काम करण्यास सक्षम असतील.

कॉर्पोरेट ट्रॅव्हलला आधीच्या टप्प्यात पोहोचण्यासाठी बर्‍याच वर्षांचा कालावधी लागेल
गेट्सच्या कॉर्पोरेट ट्रॅव्हलविषयीची भविष्यवाणी उद्योग तज्ज्ञांच्या नुकत्याच झालेल्या संशोधनासारखे आहे. या संशोधनात, तज्ञांनी असा अंदाज लावला होता की, कोरोना कालावधीच्या आधीच्या पातळीवर पोहोचण्यासाठी बरेच वर्षे लागू शकतात. बँक ऑफ अमेरिकेच्या (Bank of America) ऑक्टोबरमध्ये झालेल्या संशोधनानुसार, 2023 किंवा 2024 पूर्वी कॉर्पोरेट ट्रॅव्हल पूर्वीच्या पातळीवर येणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.