कोट्यवधींचा हेल्थ केअर घोटाळा ! आरोपी आर्थिक गुन्हेशाखेच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – दरमहा 350 रुपये याप्रमाणे 20 महिने 7 हजार रुपये गोळा करून शहरातील शेकडो नागरिकांना तब्बल 30 लाख 13 हजार 85 रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात हेल्थकेअर कंपनीचा प्रमुख नंदलाल केसरसिंग याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. घोटाळा कोट्यावधी रुपयांचा असल्याची माहिती शिक्षक दादाराव सिणगारे यांनी दिली आहे. तसेच ज्यांनी तक्रार केलेली नाही, त्यांनी देखील पुढे यावे असे आवाहनही शिनगारे यांनी केले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की अतुल जाधव (रा. बजाजनगर) यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता हेल्थकेअर सर्विसेस कंपनी लिमिटेडचे चेअरमन नन्दलाल केसर सिंग संचालक थक्केमधाथील श्रीधरण नायर, सेबेस्टीन पल्लीकल, कार्यकारी संचालक विलास बाळकृष्ण नायर आणि जोसेफ लाझर (सर्व रा. मुंबई) यांचा समावेश होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नंदलाल यास लातूर आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर, औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेने त्याचा ताबा 21 सप्टेंबर रोजी लातूर कारागृहातून घेतला. ही कामगिरी पोलीस निरीक्षक दादाराव सिणगारे, तपासी अधिकारी सहाय्यक निरीक्षक तृप्ती तोटावार, सहाय्यक फौजदार गोकुळ वाघ, नाईक विठ्ठल मानकापे, संजय जारवाल संदीप जाधव यांच्या पथकाने केली. दरम्यान, आरोपीला 24 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

नेमके प्रकरण काय –
शेनोली नल हेल्थकेअर कंपनीने दरमहा 350 रुपये प्रमाणे 20 महीने 7 हजार रुपये जमा करून घेतले. या बदल्यात कंपनी 9 वर्षांनी दुप्पट 14 हजार रुपये देणार होती. तसेच नऊ वर्षाच्या कालावधीत दवाखान्याचा खर्च हा या कंपनीच्या पॉलिसी अंतर्गत विनामूल्य होणार असल्याचे कंपनीच्या ज्योती नगर येथील कार्यालयातील व्यवस्थापक विलास पाटील यांनी सांगितले. यानुसार अतुल जाधव यांनी 1 जानेवारी 2005 ते 28 मे 2018 या कालावधीत पैसे भरले त्यानंतर 30 ऑक्टोबर 2015 रोजी पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे मूळ पॉलिसी व पैसे भरणा पावती जमा करून कंपनीच्या मुंबईतील मुख्य कार्यालयातून जाधव यांच्या नावे 14 हजार रुपयांचा धनादेश आला. मात्र, तो धनादेश वाटलाच नाही त्या कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली असता कार्यालय बंद दिसले. याच प्रकारे शहरातील शेकडो जणांना कंपनीने 30 लाख 12 हजार 85 रुपये यांना फसवण्यात आले आहे.

Leave a Comment