हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Bird Flu गेल्या अनेक दिवसांपासून बर्ड फ्लूबाबत सर्वत्र चिंतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. टेक्सासमधील एका व्यक्तीला बर्ड फ्ल्यूची (Bird Flu) लागण झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार H5N1 या विषाणूची लागण झालेल्या गाईंच्या संपर्कात आल्यानंतर त्या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण होते. हा विषाणू मानवामध्ये आढळल्यामुळे याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे..
शास्त्रज्ञांच्या मते हा विषाणू साथीच्या रोगाला कारणीभूत ठरणार आहे. हा आजारात कोविड पेक्षा 100 पटीने जास्त वाईट असू शकतो. या परिस्थितीत काही आणि कोंबड्या या दोन्हींच्या संपर्कात आलेले लोकांना याविषयी लागण झाल्याचे समोर येत आहे. आता या परिस्थितीत दूध पिणे, किंवा कोंबडी आणि अंडी खाणे सुरक्षित आहे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आलेला आहे. याबाबत आज आपण झाल्याचे समोर येत आहे. याबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत
अंडी आणि चिकन सुरक्षित आहे का? | Bird Flu
डॉक्टरांच्या मते बर्ड फ्ल्यूच्या प्रादुर्भावाने संसर्गाचा धोका कमी होण्यासाठी आणि चिकन योग्य प्रकारे शिजवले असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. योग्य प्रकारे तयार केलेल्या पोल्टरी उत्पादनामध्ये बर्ड फ्लूचा प्रसार होण्याची शक्यता खूप कमी असली, तरी तुम्ही अन्नसुरक्षा नियम म्हणजे पालन करणे देखील खूप महत्त्वाचे आहे.
अंडी किती सुरक्षित आहेत?
अंडे हे पूर्णपणे शिजवलेले असले पाहिजेत जेणेकरून त्यातील जंतू नष्ट होतील. जोपर्यंत अंड्यातील पिवळ बलक आणि पांढरा भाग घट्ट असतो आणि योग्य प्रकारे शिजवलेला असतो, तोपर्यंत खाल्ल्यास संसर्गाचा धोका खूप कमी असतो. कारण उच्च तापमानात शिजवल्यास त्यात असलेले कोणतेही विषाणू नष्ट होतात. परंतु कच्च्या किंवा कमी शिजलेल्या अंड्यांचे सेवन समस्याप्रधान असू शकते, कारण विषाणू कच्च्या अंड्यातील पिवळ बलकमध्ये टिकून राहू शकतो.
चिकन खाताना काळजी घ्या | Bird Flu
जर तुम्ही कच्चे चिकन शिजवण्यापूर्वी ते स्वच्छ करत असाल, तर संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी ते स्वच्छ केल्यानंतर हात, भांडी आणि पृष्ठभाग पूर्णपणे धुणे आवश्यक आहे. याशिवाय, ते खाण्यासाठी ते योग्य प्रकारे शिजवणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा कोंबडी 165°F (74°C) तापमानाला शिजवली जाते तेव्हा कोंबडीतून एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरससह कोणतेही सूक्ष्मजीव मारले जातात.