हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी बर्ड फ्लूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीला एव्हियन इन्फ्लूएंझा ए (एच5एन2)ची लागण झाली होती. बर्ड फ्लूच्या(Bird Flu Death) विषाणूमुळे एका मानवाचा मृत्यू झाल्याची पहिली घटना घडली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात विषाणूबाबत भीती निर्माण झाली आहे. परंतु, WHO ने याबाबत माहिती देत म्हटले आहे की, सध्या लोकांना H5N2 विषाणूचा धोका खूप कमी आहे. तरीही त्यांनी सावधगिरी बाळगायला हवी.
WHO च्या माहितीनूसार, बर्ड फ्लूची लागण झालेल्या 59 वर्षीय व्यक्तीचा मेक्सिको सिटीमधील रुग्णालयात मृत्यू झाला. सुरुवातीला या व्यक्तीत ताप येणे, श्वास घेण्यास त्रास आणि जुलाब अशी लक्षणे दिसून आली होती. यामुळे त्याला 24 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या व्यक्तीचा त्या दिवशी मृत्यू झाला. डॉक्टरांचे सांगितले की, या व्यक्तीला आधीच मूत्रपिंड निकामी होण्यासह अनेक वैद्यकीय समस्या होत्या. यात तो कोंबडी किंवा इतर प्राण्यांच्या संपर्कात आला नव्हता. असे असताना त्याला बर्ड फ्लू कसा झाला हे शोधणे कठीण आहे.
महत्वाचे म्हणजे, मृत्यू झालेल्या व्यक्तीला बर्ड फ्लूच्या विषाणूची लागण कुठे झाली हे मेक्सिकन सरकारला अजूनही सापडलेले नाही. दुसऱ्या बाजूला, WHO म्हणणे आहे की, सध्या H5N2 विषाणूचा धोका कमी आहे. या प्रकरणानंतर बर्ड फ्लू विषाणूच्या संसर्गाची इतर कोणतीही प्रकरणे नोंदवली गेली नाहीत. कारण, मृत व्यक्तीच्या नमुन्यात बर्ड फ्लूचा विषाणू असल्याची पुष्टी केल्यानंतर मेक्सिकन सरकारने 23 मे रोजी याबाबतची माहिती WHO ला माहिती दिली.
दरम्यान, झारखंडची राजधानी रांचीमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याची प्रकरणे नुकतीच समोर आली आहेत. त्यामुळे सरकारने राज्यातील पोल्ट्री फार्मना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यापूर्वीही भारतात पशु-पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र एखाद्या व्यक्तीला या विषाणूची लागण झाली असल्याचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. परंतु मेक्सिकोमध्ये एका व्यक्तीला या विषयाचे लागण झाली आहे.