Birth And Death Registration | जन्म आणि मृत्यूचा दाखला आपल्याकडे असणे. हा प्रत्येक नागरिकांचे प्रमुख कागदपत्र आहे. या कागदपत्राची नोंदणी सरकार दरबारी देखील होत असते. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. ज्यावेळी जन्म प्रमाणपत्र काढले जाते त्यावेळी त्या नागरिकाचे जन्माची नोंद केली जाते. या प्रमाणपत्रात व्यक्तीचे संपूर्ण नाव, जन्म तारीख, जन्मस्थान, बायोलॉजी कल माता-पितांचे नाव या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. कागदपत्रांवरून व्यक्तीची ओळख वय किती आहे? या सगळ्यांची माहिती मिळते. त्यामुळे जन्म प्रमाणपत्र काढणे खूप गरजेचे असते. या प्रमाणपत्राचे इतर अनेक महत्त्व देखील आहे. राष्ट्रीय आणि स्थानिक जनसंख्या आरोग्य नियोजनाच्या रेकॉर्डमध्ये याची माहिती दिली जाते. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होते त्यावेळी मृत्यूची नोंद देखील केली जाते.
महाराष्ट्रात जन्म प्रमाणपत्र कसे काढावे? | Birth And Death Registration
- तुम्हाला जर जन्म आणि मृत्यूचा दाखला काढायचा असेल किंवा नोंदणी करायची असेल तर तुम्ही या वेबसाईटला भेट द्या.
- https://www.urban.maharashtra.gov.in/
- त्यानंतर तुम्हाला जन्म प्रमाणपत्र नोंदणी या बटणावर क्लिक करायचे आहे.
- तुम्ही जर नवीन यूजर असाल तर तुम्हाला नोंदणी करून आधीची नोंदणीकृत असल्यास लॉगिन लॉगिन करायचे आहे.
- त्यानंतर सगळी आवश्यक माहिती आणि कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे.
- त्यानंतर तुम्हाला तुमची फी भरायची आहे आणि सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि पावती मिळेल.
- त्यानंतर 15 दिवसांच्या आत तुमचे जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होईल.
- हे तुम्ही डाउनलोड करून प्रिंट देखील होऊ शकता.
ऑफलाइन नोंदणी पद्धत
- तुम्हाला जर ऑफलाइन पद्धतीने तुमचा जन्माची नोंद करायची असेल तुम्हाला तुमच्याजवळील जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयात जावे लागेल.
- त्यानंतर ते जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करा आणि आवश्यक असणारी सगळी माहिती द्या.
- त्यानंतर तुमची फी भरा आणि तुमचा अर्ज जमा करा.
- 7 ते 15 दिवसांमध्ये तुमचे प्रमाणपत्र तयार होईल आणि तुम्ही ते कार्यालयातून जमा करू शकता.
आवश्यक कागदपत्रे
- हॉस्पिटल डिस्चार्ज सारांश
- पालकांचे विवाह प्रमाणपत्र
- पालकांचे आधार कार्ड
- पत्ता पुरावा (जसे की वीज बिल, रेशन कार्ड)
- जन्म घेणाऱ्या मुलाचा / मुलीचा फोटो
- तुम्ही MahaGov Seva Kendra द्वारे देखील प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता.