Thursday, March 23, 2023

बर्थडे गर्ल सोनाक्षी सिन्हा होतेय वाढदिवशीच ट्रोल; ट्विटरवर मिम्सचा पाऊस

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची ‘दबंग’ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा आज ३४वा वाढदिवस आहे. २ जून १९८७ रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे सोनाक्षीचा जन्म झाला. शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांची सोनाक्षी मुलगी असून तिने फॅशन डिझाईनिंगमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. सोनाक्षीने अभिनेत्री म्हणून नाही तर कॉस्च्यूम डिझाईनर म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते मात्र तिचा प्रवास डिझाइनर पासून थेट अभिनेत्री असा झाला. आज सोनाक्षीचा वाढदिवस असल्याने इंडस्ट्रीतील बरेचसे कलाकार तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र सोशल मीडियावर तिला थोडं वेगळ्याच पद्धतीने बर्थडे विश केलं जातंय. सोनाली चक्क वाढदिवसाच्या दिवशीच ट्रोल होतेय. आश्चर्य वाटलं ना.. पण हेच खरं आहे. ट्विटरवर सोनाक्षीच्या विविध चित्रपटातील सिन वापरून मिम्स तयार केलेले दिसत आहेत.

https://twitter.com/IzzaHassan7/status/1399953523479957514

- Advertisement -

वाढदिवसाच्या निमित्ताने सोनाक्षीच्या अनेको चाहत्यांनी तिच्यावर भरभरून शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. त्यामुळे ती ट्विटरवर टॉप ट्रेण्डमध्ये आली होती. मात्र काही नेटक-यांना सोनाक्षीचं टॉप ट्रेण्डमध्ये झळकणे फारसे काही रुचले नाही.

मग..? अहो मग काय.. या नेटक-यांनी सोनाक्षी वरचे मीम्स शेअर करण्याची लांबलचक सीरिजचं लावली. ट्विटरवर टॉप ट्रेण्डमध्ये आल्यानंतर काही वेळेतच सोनाक्षीचे अनेक विनोदी मीम्स सोशल मीडियावर जोरदार वेगाने वायरल होवू लागले.

सोनाक्षी सिन्हा टॉप ट्रेण्डमध्ये येण्यास पात्र नसल्याचे म्हणत अनेकांनी हे मीम्स आणखी शेअर केले.

https://twitter.com/sj_shubh_msdian/status/1399938598636429317

‘मेरा दिल लेकर देखो’ या २००५ मध्ये आलेल्या चित्रपटासाठी सोनाक्षीने कॉस्च्युम डिझाईनर म्हणून काम केले. इथून तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. पण यानंतर पाच वर्षांनी म्हणजे २०१० मध्ये तिने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून डेब्यू केला.

सलमान खानच्या अपोझिट ‘दबंग’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये अगदी ग्रँड एन्ट्री घेतली. यातील सोनाक्षीच्या अभिनयाची चांगलीच प्रशंसा झाली आणि मग सोनाक्षीने कधीच मागे वळून पाहिले नाही. चित्रपटात येण्यापूर्वी सोनाक्षीने मॉडेलिंगही केले होते. आज सोनाक्षी आघाडीच्या अभिनेत्रींनपैकी एक आहे.