हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| खाद्यप्रेमींचा सर्वाधिक आवडता पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजे बिर्याणी. बिर्याणीचे नाव जरी काढले तरी सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही भारतामध्ये सर्वाधिक मागणी बिर्याणीची करण्यात आली आहे. एक जानेवारी 2023 रोजी ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅप स्विगीवर 4.3 लाख बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली होती. तर 83 हजार नूडल्सची ऑर्डर देण्यात आली होती.
सर्वाधिक बिर्याणीची मागणी
स्विगीने दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन फूड डिलिव्हरी अँप वरून सर्वाधिक मागणी ही बिर्याणीची करण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून सर्वाधिक ऑर्डर बिर्याणीची देण्यात आली आहे. यावर्षी तर प्रत्येक सेकंदाला 2.5 बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली. त्यापैकी 5.5 चिकन बिर्याणीमागे एक व्हेज बिर्याणीची ऑर्डर देण्यात येत होती. यामध्ये बिर्याणीची ऑर्डर देणारे 24.9 लाख लोक पहिल्यांदाच स्विगी वापरणारे होते.
इतकेच नव्हे तर, हैदराबाद मधील एका व्यक्तीने एकूण 1,633 बिर्याणीची ऑर्डर दिली होती तसेच वर्ल्ड कपच्या मॅचवेळी चंदिगडमधील एका कुटुंबाने 70 प्लेट बिर्याणी ऑर्डर दिली होती. त्यामुळे दर मिनिटाला स्विगीला 250 बिर्याणीची ऑर्डर मिळत होती.
दरम्यान, बिर्याणीबरोबर भारतीयांना रसगुल्लापेक्षा गुलाबजाम अधिक आवडते असे देखील समोर आले आहे. कारण दुर्गा पूजेदरम्यान गुलाबजामच्या 77 लाख ऑर्डर देण्यात आल्या होत्या. तरी यापेक्षा कमी ऑर्डर रसगुल्लासाठी देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सध्या भारतीयांसाठी रसगुल्लाऐवजी गुलाबजाम जास्त आवडता पदार्थ ठरला आहे.