बिटकॉइनने गेल्या तीन महिन्यांत पहिल्यांदाच $ 50,000 चा आकडा पार केला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बिटकॉईनच्या किमतीत घट झाल्यानंतर आता पुन्हा त्यात वाढ झाली आहे. किंमतींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. मार्केट कॅपिटलायझेशननुसार , सर्वात मोठे चलन असलेले बिटकॉइनने गेल्या तीन महिन्यांत पहिल्यांदाच सोमवारी $ 50,000 चा आकडा पार केला. बिटकॉइनची किंमत $ 50,152.24 पर्यंत गेली. मेच्या मध्यापासून ही त्याची सर्वोच्च पातळी आहे. कित्येक आठवड्यांसाठी $ 30,000-40,000 दरम्यान ट्रेड केल्यानंतर बिटकॉइन सावरला आहे.

एप्रिलमध्ये बिटकॉइनची किंमत 65,000 डॉलर्सच्या उच्चांकी पातळीवरून घसरली. CoinDesk च्या मते, इथेरियम ब्लॉकचेनशी जोडलेल्या इथरची किंमत $ 3,321 पर्यंत वाढली. बिटकॉईन नंतर ही दुसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. Dogecoin 1 टक्क्यांनी वाढला आणि $ 0.32 वर ट्रेड करत होता.

स्टेलर, XRP, कार्डानो आणि लिटकॉइनमध्येही तेजी आली
याशिवाय, स्टेलर, XRP, कार्डानो आणि लिटकॉइनलाही गती मिळाली आहे. काही आठवड्यांपूर्वी क्रिप्टो मार्केटमध्ये चीनने बिटकॉइनचे मायनिंग कडक केल्यामुळे आणि क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंग वरील निर्बंधांमुळे लक्षणीय घट झाली होती. तथापि, त्यानंतर टेस्लाचे संस्थापक एलन मस्क आणि आर्क इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटच्या कॅथी वुड यांच्या सकारात्मक ट्वीट्समुळे बिटकॉइनमध्ये रिकव्हरी झाली.

क्रिप्टोकरन्सीची एकूण मार्केटकॅप सुमारे $ 2.17 ट्रिलियन पर्यंत पोहोचले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये कार्डानोमध्ये 18 टक्के आणि Binance Coin मध्ये 11 टक्के वाढ होण्यास हातभार लागला आहे.

coinmarketcap.com इंडेक्सनुसार, सकाळी 11 पर्यंतचे जगातील 10 सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीचे दर जाणून घ्या-

बिटकॉइन – किंमत 2.88 टक्क्यांनी वाढून $ 5,0409.16 झाली.
इथेरियम – किंमत 3.55 टक्क्यांनी वाढून $ 3346.78 झाली.
कार्डानो – किंमत 11.60 टक्क्यांनी वाढून $ 2.80.
Binance Coin – किंमत 7.37 टक्क्यांनी वाढून $ 482.80 झाली.
टेथर – किंमत 0.03 टक्क्यांनी वाढून $ 1.00 झाली.
XRP – किंमत 1.71 टक्क्यांनी वाढून $ 1.25 झाली.
डॉजकोइन – किंमत 2.17 टक्क्यांनी वाढून $ 0.3229 झाली.
पोल्का डॉट – किंमत 3.52 टक्क्यांनी वाढून $ 28.57 झाली.
USD Coin – किंमत 0.03 टक्क्यांनी वाढून $ 1.00 झाली.
सोलाना – किंमत 0.67 टक्क्यांनी घसरून $ 74.21 झाली.
Uniswap – किंमत 3.09 टक्क्यांनी वाढून $ 29.46 झाली.