जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन दररोज रचत आहे नवीन विक्रम ! आज पहिल्यांदाच ओलांडला 51,000 डॉलर्सचा आकडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन (Bitcoin) वाढीच्या बाबतीत दररोज नवीन विक्रम तयार करत आहे. मंगळवारी विक्रमी पातळीला स्पर्श केल्यानंतर 17 फेब्रुवारी 2021 रोजी बिटकॉईनने आपल्या सर्वकालिन उच्चांकाला स्पर्श केला. बुधवारी बिटकॉईनने पहिल्यांदाच 51,000 डॉलर्सचा आकडा पार केला. खरं तर, इलेक्ट्रिक कार बनविणारी अमेरिकन कंपनी टेस्ला (Tesla) सह अनेक कंपन्यांनी डिजिटल करन्सी (Digital Currency) म्हणून बिटकॉइनला मान्यता दिली आहे. यामुळे या क्रिप्टोकरन्सीच्या किंमती वेगाने वाढत आहेत.

यावर्षी आतापर्यंत 79 टक्के मोठी उडी आली आहे
बुधवारी बिटकॉईनने 6 टक्क्यांची उडी नोंदविली आणि 51,431 डॉलरच्या नवीन स्तरावर पोहोचला. सन 2020 मध्ये त्याची किंमत 2019 च्या तुलनेत 5 पट जास्त नोंदविली गेली. यावर्षी आतापर्यंत बिटकॉईनच्या किंमतीत 79 टक्के वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने सोमवारी सांगितले की, कंपनी आपली गुंतवणूक योजना म्हणून बिटकॉइनमध्ये 1.5 अब्ज डॉलर्सची खरेदी करीत आहे. तसेच ही कंपनी लवकरच आपल्या उत्पादनांच्या खरेदीवर बिटकॉइनद्वारे पेमेंट मंजूर करण्याच्या योजनेवर काम करीत असल्याचेही सांगितले. यामुळे बिटकॉइनमध्ये जोरदार वाढ झाली. त्यानंतर, व्हर्जिनियाच्या (Virginia) ब्लू रिज बँक ऑफ शर्लोविला (Charlottesville) ने सांगितले की,”त्यांच्या शाखांमध्ये बिटकॉइनची सुविधा उपलब्ध करुन देणारी ती पहिली व्यावसायिक बँक होईल.”

5 वर्षात बिटकॉईन व्यवहाराचे चलन होईल 
अमेरिकेची सर्वात जुनी बँक बीएनवाय मेलॉन (BNY Mellon) ने सांगितले की,” लवकरच ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये डिजिटल करन्सीचा समावेश केला जाईल. इतकेच नाही तर मास्टरकार्डने असेही म्हटले आहे की,”ते आपल्या नेटवर्कवर काही क्रिप्टोकरन्सीला सपोर्ट देण्यास सुरुवात करतील. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे फायनान्स प्राध्यापक रिचर्ड लायन्स म्हणाले की,”बिटकॉइन्ससह इतर डिजिटल करन्सीज येत्या पाच वर्षांत व्यवहारांचे चलन बनतील. बिटकॉइन ही एक व्हर्चुअल करन्सी आहे. ते डॉलर, रूपये किंवा पौंड यासारखे वापरले जाऊ शकते. डॉलरसह इतर चलनांमध्येही ते बदलले जाऊ शकते.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment