महाराष्ट्राने रिटायर्ड केलंय पण पंतप्रधानपदाची आस साहेबांना स्वस्थ कुठे बसू देते ?? ; भाजप नेत्याचा पवारांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं होत. सुप्रिया सुळे म्हणाल्या , “देवेंद्र फडणवीस म्हणाले होते शरद पवारांनी रिटायर्ड व्हावं. छान मार्गदर्शन केलं होतं. मात्र महाराष्ट्राने शरद पवारांना रिटायर्ड करायचं नाही हे ठरवलं होतं. त्यामुळे ‘एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा ? महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस एक तरफ’. शरद पवार म्हटले असते मी आता देवेंद्र फडणवीस बोलत आहेत तर रिटायर्ड होतो, परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात तसं नाही.” असं भाष्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं.

सुप्रिया सुळेंच्या या टीकेला भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८० वर्षीय राष्ट्रीय अध्यक्षाला आजही ‘प्रांताध्यक्षा’ सारखे राज्यातच गुंतवून ठेवले आहे आणि फडणवीसांनी एकट्यानेच १०५ निवडून आणले; जे शरद पवारांना आजपर्यंत जमले नाही. महाराष्ट्राने रिटायर्डच केले पण पंतप्रधानपदाची आस साहेबांना स्वस्थ कुठे बसू देते ?’ अशी जहरी टीका तुषार भोसले यांनी केली आहे.

आता आचार्य तुषार भोसले यांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काय प्रत्युत्तर येत हे पाहणं महत्त्वाचे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’