व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे की इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ उद्धव ठाकरेंच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

आचार्य तुषार यांनी ट्विट करत म्हंटल की, ठाकरे कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू पण दीड वर्ष झालं तरी भगवाधारी साधुंना ठेचून मारणार्यांना शिक्षा देणार नाही , महाराष्ट्रात येऊन हिंदु समाजाला सडका म्हणणार्या शर्जिल उस्मानीला मोकाट फिरू देऊ , त्याला दंड होऊ देणार नाही.

मुख्यमंत्र्यांचं कुटुंब हे संपूर्ण राज्य असते पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कुटुंब हे केवळ ठाकरेंपुरतेच आहे ; ‘महाराष्ट्र’ त्यांच्या कुटुंबाचा भाग नाही हे काल त्यांनी सिद्ध केलं. इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ महाराष्ट्राला मिळाला ,हेच महाराष्ट्राचं दुर्दैव