फडणवीस- चंद्रकांत पाटलांकडून 100 कोटींची ऑफर होती, पण.. ; शशिकांत शिंदेंचा धक्कादायक गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि दिग्गज नेते शशिकांत शिंदे यांनी मोठा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्यासाठी मला पण ऑफर दिली होती पण ती मी धुडकावली, असा गौप्यस्फोट आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. भाजप आणि शिवसेना सरकारच्या काळात भाजपने अनेक नेत्यांना पक्ष प्रवेशाच्या ऑफर दिल्या होत्या. अशीच ऑफर त्यावेळी मलाही दिली होती, असं शिंदे म्हणाले.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला असल्याचा दावा आ.शशिकांत शिंदे यांनी केला आहे. या प्रवेशानंतर तुम्हाला मंत्रीपद देतो असे सांगून पोटनिवडणुकीत 100 कोटी खर्च करण्याची ऑफरही भाजपने दिली असल्याचा धक्कादायक खुलासा आ.शशिकांत शिंदे यांनी केला आहे. मात्र ही ऑफर त्यावेळेस मी नाकारली होती आणि यापुढेही नाकारणार असल्याचे ते म्हणाले.

कोण आहेत शशिकांत शिंदे?

शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. शरद पवारांचे ते अत्यंत विश्वासू असून सातारा जिल्ह्यातील राजकारणात त्यांचा दबदबा आहे. गतवर्षी झालेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले याना पाडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment