तुम्हांला मुख्यमंत्री म्हणू की पक्षप्रमुख; टिपू सुलतान वादावरून भाजप नेत्याचे खरमरीत पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्यानंतर भाजप आक्रमक झाली असून नवा वाद निर्माण झाला आहे. उद्यानाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर आता अमित साटम यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. तुम्हांला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

अमित साटम यांनी याआधी पत्रात म्हटलंय की, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मंत्री अस्लम शेख यांच्याकडून एक पत्र व्हायरल केले जात आहे. ज्यामध्ये २७ डिसेंबर २०१३ रोजी महापालिकेच्या सभेत एका रस्त्याला टिपू सुलतान मार्ग नाव देण्याच्या प्रस्तावाला मी अनुमोदन दिले होते. परंतु असा कुठलाही फॉर्मेट मुंबई महापालिकेचा नाही. व्हायरल झालेले पत्र हे नव्याने तयार करण्यात आले आहे असा आरोप त्यांनी केला.

त्याचसोबत अनुमोदकाच्या ठिकाणी खाडाखोड करुन माझे नाव अ. भा. साटम असं हाताने लिहिलेले दिसून येते. या पत्रावर खाली सही आणि मंजूर असे लिहिलंय. म्हणजेच सदर प्रस्तावावर खाडाखोड करुन माझं नाव लिहिलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्र पूर्णपणे खोटे व नव्याने तयार केलेले आहे. त्यामुळे याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राज्याचे मंत्री अस्लम शेख आणि मुंबई महापालिकेचे चिटणीस यांच्याविरोधात ४२०, ४९९, ५०० च्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपा आमदार अमित साटम यांनी केली आहे.

आपल्या महापौर किशोरीताई पेडणेकर एका बाजुला जाहीर करतात की टिपू सुलतान क्रिडांगण नामकरणाचा फलक अवैध आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल. दुसऱ्या बाजुला त्याचाच बचाव करण्यासाठी खोटी बनावटी दस्ताऐवज वापताहेत. वास्तविक जर टिपू सुलतान नामफलक अवैध असेल तर महापौरांनी ते उतरवले पाहिजे होते. पण पालकमंत्र्यांच्या बचाव कार्यतच त्या मग्न आहेत. असेही त्यांनी म्हंटल.

Leave a Comment