पिढ्यानपिढ्या तुम्ही सत्तेत, आमच्याकडे कसले हिशेब मागता ?अमित शहांचा काँग्रेससह विरोधकांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संसदेत सुरु असलेल्या अधिवेशना दरम्यान लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षांवर सडकावून टीका केली. जम्मू-कश्मीरातून कलम 370 हटवून केवळ 17 महिने झाले आहेत. 70 वर्षे तुम्ही योग्य रीतीने कारभार केला असता तर आमच्याकडे हिशेब मागण्याची वेळ आली नसती, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

जम्मू-कश्मीरमध्ये आतापर्यंत केवळ तीन कुटुंबांचे शासन होते. त्यामुळे कलम 370 हटविल्याचा त्रास या तीन कुटुंबियांनाच होत आहे. जम्मू-कश्मीरमध्ये यापुढे जनता शासन निवडेल. त्यासाठी कोणत्या राजा आणि राणीच्या घरात जन्म घ्यायची गरज नाही. जनताच आपला प्रतिनिधी निवडेल. अस अमित शहा म्हणाले.

शाळा जाळल्या नसत्या तर कश्मिरी तरुण आयएएस आणि आयपीएस अधिकारी झाले असते. कलम 370 हटवून केवळ 17 महिने झालेत आणि आमच्याकडे हिशेब मागितला जात आहे. जे पिढय़ान्पिढय़ा सत्तेत होते त्यांनी आधी हिशेब द्यावा. आमच्याकडे कसला हिशेब मागता? 70 वर्षे ज्यांनी राज्य केले त्यांनी स्वतःकडे पाहावे आणि ठरवावे की, आपण खरंच हिशेब मागण्याच्या लायक आहोत का? असा सवाल अमित शहा यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like