विधान परिषदेसाठी भाजपकडून 3 उमेदवार जाहीर; पहा कोणाकोणाला संधी??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी (Vidhan Parishad Election) लगबग सुरू झाली आहे. अशातच आता भाजपने एकूण 3 मतदारसंघांसाठी आपले उमेदवार घोषित केले आहे. भाजपने कोकण पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार (Kiran Shelar) आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवनाथ दराडे (Shivnath Darade) यांचे नाव जाहीर केले आहे.

येत्या 26 जून रोजी विधान परिषदेच्या कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकिय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जात आहे. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये एकमत झालेले दिसत नाही. असे असताना ही भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे.

महत्वाचे म्हणजे, मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी देखील भाजपाने किरण शेलार यांना संधी दिली आहे. त्यामुळे त्यांचा सामना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याशी होणार आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून भाजपने शिवनाथ दराडे यांना संधी दिली आहे. याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव नलावडे यांना संधी दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय वर्तुळात जोरदार सामना रंगणार आहे.