भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची नावे जाहीर; पंकजा मुंडेंसह या नेत्यांना दिली संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भाजपकडून (BJP) आज विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासह योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांच्या नावाचा समावेश आहे. म्हणजेच या यादीत चार ओबीसी उमेदवारांना तर एका दलिस उमेदवाराला स्थान देण्यात आले आहे.

विधानसभेच्या 11 जागा या रिक्त असून त्यातील पाच जागा भाजपला मिळणार आहेत. या पाच जागांसाठीच भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महत्वाचे म्हणजे, भाजपने या निवडणुकीत पिंपरी चिंचवड येथील रहिवासी अमित गोरखे यांना उमेदवारी जाहीर केले आहे. ते भाजपच्या आयटी सेलचे काम पाहतात. अमित गोरखे हे एका दलित कुटुंबातून येतात. यंदा भाजपने पुण्यातील योगेश टिळेकर यांनाही उमेदवारी जाहीर केली आहे. ते भाजपचे हडपसरचे मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

या दोन नेत्यांना संधी नाही

खास म्हणजे, या उमेदवारांच्या यादीत भाजपने पंकजा मुंडे यांना देखील स्थान दिले आहे. मधल्या काळात पंकजा मुंडे राजकारणातून बाजूला सरल्या होत्या. त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी भाजपने पंकजा मुंडे यांनाही संधी दिली आहे. त्यांच्यासह सदाभाऊ खोत यांना देखील भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली आहे. परंतु विधानपरिषदेसाठी इच्छुक असलेल्या रावसाहेब दानवे यांना भाजपने संधी दिलेली नाही. तसेच हर्षवर्धन पाटील यांना ही भाजपने वगळले आहे.