उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका, भाजप पाठिंबा देईल; शेलारांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्याची ठाम भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, त्यांनी शरद पवारांच्या दबावासमोर झुकू नये. उद्धवजींनी ठाम भूमिका घेतल्यास भाजप 100 % शिवसेनेला समर्थन देईल असे मोठे विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे.

आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरेंनी देशहितासाठी आतंकवादाच्या विरोधात ताठमानेने उभं राहावं. त्यांनी शरद पवारांच्या दबावासमोर झुकू नये. मुख्यमंत्र्यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश द्यावेत की, दाऊद, दाऊदचे हस्तक, दाऊदच्या गँगमधली लोक आणि त्यांचा राजकीय वरदहस्त असलेल्या नवाब मलिकांसारख्या सगळ्या लोकांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

महाविकासआघाडीतील तीन पक्षांपैकी दोन पक्ष वाया गेले आहेत. त्यामुळे आमची अपेक्षा केवळ उद्धव ठाकरे यांच्याकडूनच आहे. आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेतल्यास भाजप त्याला पूर्णपणे पाठिंबा देईल, असे आशिष शेलार यांनी जाहीर केले.

Leave a Comment