शिवसेनेची भूमिका राम मंदिर विरोधी ; आशिष शेलारांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरा वरून भाजपला टोला लगावला होता.  ‘राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला होता. शिवसेनेच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिल असून शिवसेनेची भूमिका ही राम मंदिर विरोधी आहे असा घणाघाती आरोप देखील त्यांनी केला आहे.

आधी म्हणायचं पहिले मंदिर फिर सरकार, पण सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडंग आणायचा. शिवसेना खासदार संजय राऊत यांची भूमिका राम मंदिर विरोधी आहे, अशा शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला. मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे?” असा बोचरा सवालही शेलारांनी विचारला.

भाजपसाठी हा मुद्दा राजकीय नाही. संजय राऊत आणि शिवसेना या दोघांनाही राम मंदिराच्या कामात अडंग आणण्याची भूमिका घेण्यासाठी प्रवृत्त कोण करत आहे, पायाभरणी कार्यक्रमही ई पद्धतीने घेण्याची मागणी होती, आता सामान्य नागरिकांच्या स्वेच्छेने येणाऱ्या निधीतून राम मंदिराचं काम होतंय. आधी म्हणायचं पहिले मंदिर फिर सरकार, पण सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडंग आणायचा, या पद्धतीची राम मंदिर विरोधी भूमिका शिवसेना घेत आहे, असं आमचं मत आहे.असं ते म्हणाले.

 

“राम जन्मभूमी आंदोलन म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, वंदनीय अशोक सिंघल, मोरोपंत पिंगळे, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, महंत रामचंद्र परमहंस यांच्यासह कोठारी बंधू ते कारसेवक, किती नावे संघर्षाची, त्यागाची, समर्पित आयुष्याची घ्यावीत. या आंदोलनात ज्यांची केवळ राजकीय घुसखोरी होती, त्यांनाच राम मंदिराच्या भूमी पूजनाची पोटदुखी झाली होती. त्यांनाच आता “रामवर्गणी” डोळ्यात खूपत आहे. राम भक्त हो! मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे?” असं ट्विटही आशिष शेलार यांनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment