शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का?; आशिष शेलारांनी व्यक्त केला संताप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरजील इस्मानीच्या हिंदूविरोधी वक्तव्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं आहे. भाजपा याबाबत आक्रमक झाली असून शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का? असा थेट सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच ठाकरे सरकारने शरजीलला पळून जाण्यात मदत केली असा गंभीर आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरजीलने केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणं याचा अर्थ यांचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. अटक केली जाईल म्हणजे कधी आम्ही मागणी केल्यावर. परिषदेला परवानगीच का दिली?,” असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला आहे.

शरजील उस्मानी याला पळवून लावण्यात आलं आहे. त्याला पळवून लावण्यास कोणी मदत केली. सरकारमधील कोणत्या मंत्र्याचा हात आहे. एल्गारची पार्श्वभूमी माहीत असतानाही एल्गार परिषदेला परवानगी का देण्यात आली? असा सवाल करतानाच भाजपच्या आंदोलनानंतर सरकारला दोन दिवसाने जाग आली. त्यानंतर शरजीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरे तर शिवसेना ही अमिबालाही लाज वाटेल अशा पद्धतीने दिशाहीन झाल्याचंच हे लक्षण आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment