हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थितीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर निशाणा साधला होता. मोदींना अद्याप कोरोनाच समजला नसल्याची टीका राहुल गांधींनी केली. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर देत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. देश मोदींच्या पाठीशी उभा असून तुम्ही तीनचाकी खटारा तर सांभाळा असे अतुल भातखळकर यांनी म्हंटल.
राफेल राफेल करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला, जनतेने अमेठीतून विकेट काढली. आता कोरोनावर स्वार होऊन सत्तेची स्वप्न बघतायत. सत्तेवाचून तडफड सुरू आहे. कितीही चिखल उडवला तरी देश मोदींच्या मागे खंबीर उभा आहे, तुम्ही महाराष्ट्राला रसातळाला नेणारा तीनचाकी खटारा तर सांभाळा,’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.
राफेल राफेल करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला,जनतेने अमेठीतून विकेट काढली.आता कोरोनावर स्वार होऊन सत्तेची स्वप्न बघतायत.सत्तेवाचून तडफड सुरू आहे.
कितीही चिखल उडवला तरी देश मोदींच्या मागे खम्बीर उभा आहे, तुम्ही
महाराष्ट्राला रसातळाला नेणारा तीनचाकी खटारा तर सांभाळा.@RahulGandhi— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 28, 2021
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले –
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे पत्रकार परिषद घेत मोदींवर टीका केली होती. नरेंद्र मोदींची नौटंकी हेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं प्रमुख कारण आहे. अद्यापही त्यांनी कोरोनाला समजून घेतलं नाही अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदींवर हल्लाबोल केला होता.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.