पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि…..भाजपची खोचक टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस…. याच निमित्ताने शिवसेनेने आपल्या सामना मुखपत्रातील अग्रलेखातुन शरद पवारांची भरभरून स्तुती केली आहे.दिल्लीला पवारांच्या कर्तृत्वाची नेहमीच भीती वाटत आली. पवारांची हत्तीची चाल व वजिराचा रुबाब उत्तरेच्या ‘जी हुजुरी’ नेत्यांना अडचणीचा ठरला असता. त्यातून पवार बेभरवशाचे नेते असल्याची हाकाटी कायम सुरू ठेवली गेली, असं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं होतं. दरम्यान यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हो तर, पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि कधी कुठे भूकंप येईल याची काय शाश्वती?,” असं म्हणत भातखळकर यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

पवार हे ८० वर्षांचे झाले यावर कोण विश्वास ठेवणार? आज शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी वडीलकीच्या नात्याने ‘शरदबाबूं’ना भरभरून आशीर्वाद दिले असते, पण आज पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत. पवार स्वतःच ‘सह्याद्री’ बनून देशाचे नेते झाले आहेत. ५० वर्षांपेक्षा जास्त काळ पवार संसदीय राजकारणात आहेत. ते सर्वच निवडणुकांत अजिंक्य आहेत. पवारांना जनतेने भरभरून आशीर्वाद दिले. अर्थात हे आशीर्वाद ज्यांच्या बाबतीत सफल झाले अशा मोजक्या भाग्यशाली माणसांत शरद पवार आहेत.अस सामना अग्रलेखात म्हंटल होत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment