घरात उकिरडा माजलाय आणि राष्ट्रवादीचे नेते जगाला शहाणपण शिकवतात ; भाजपने साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक केलेल्या ब्रिटिश नागरिक करण सजनानीशी त्यांचा ड्रग्ज तस्करीतून आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपातून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर जोरदार निशाणा साधला आहे.

नबाब मलिक यांच्या जावयाला अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अटक. हे राष्ट्रवादीचे नेते घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवतात. नबाब मलिक इतके वाह्यात कसे बोलतात हे लक्षात आलं का,” असं म्हणत भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली.

दरम्यान, आज नवाब मलिक यांनी या प्रकरणावर भाष्य केले. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नसतो. कोणत्याही भेदभावाशिवाय हा नियम सगळ्यांना लागू झाला पाहिजे. कायदा त्याचं काम करेल आणि न्याय नक्की मिळेल. मला न्यायसंस्थेविषयी पूर्ण आदर आणि विश्वास असल्याचे नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like