ही तर ठाकरे सरकारची हुकूमशाही ; रिपब्लिक चॅनेल सीईओंच्या अटकेनंतर भाजपच ठाकरे सरकारवर टीकास्त्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक चॅनेलचे चे सीईओ विकास खानचंदानी यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारची हुकूमशाही सुरू आहे”, अशी टीकाअतुल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून केली.

पोलिसांनी कोणत्याही कागदपत्रांशिवाय खानचंदानी यांना अटक केल्याचं रिपब्लिक टीव्हीकडून सांगितलं जात आहे. याच मुद्द्यावर भाजपा नेत्यांकडून सरकारवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. “कोणत्याही कागदपत्रांशिवाय रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सीईओ यांच्या घरी मुंबई पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अटक केली… महाराष्ट्रात लोकशाही पूर्णपणे संपुष्टात आली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारची हुकूमशाही सुरू आहे”, अशी टीका भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून केली.

फेक ‘टीआरपी घोटाळा’ (Fake TRP scam) प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. टीआरपी घोटाळ्याप्रकरणी विकास खानचंदानी यांची याआधी चौकशीही करण्यात आली. रिपब्लिक वृत्तवाहिनीने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्याचसोबत या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’ कडे देण्याची मागणीही केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment