Sunday, March 26, 2023

सत्तेची खुर्ची गेली, आता बसायची पण टिकेना..? जेव्हा भर पत्रकार परिषदेत चंद्रकांतदादांची खुर्ची मोडते..!!

- Advertisement -

सोलापूर प्रतिनिधी । राजकारणी आणि खुर्चीचं नातं अतूट आहे. मात्र, खुर्चीनेच दगा दिला तर.. हो असाच काहीसा प्रसंग महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर ओढवला. राज्यातील सत्तासंघर्षात खुर्ची गमावलेले चंद्रकांत दादा पाटील आज सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी पत्रकारांचे प्रश्न आणि दादांची तडाखेबंद उत्तर यामुळं ऐन भरात आलेल्या पत्रकार परिषेदमध्ये अचानक गोंधळ उडवणार प्रसंग घडला.

Untitled design (55)

- Advertisement -

भाजप पक्षातील पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे नाराज असल्याच्या वृत्तावरून पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला. यावर उत्तर देत चंद्रकांतदादा पक्षामध्ये कोणीच नाराज नाहीये असं सांगत असतानाच दादांना अचानक ते बसलेल्या खुर्चीने दंगा दिला. खाड्कन.. आवाज होत दादांची खुर्ची मोडली आणि दादा खाली कोसळले. दरम्यान प्रसंगावधान ठेवत त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना उचललं आणि त्यांना दुसरी खुर्ची बसायला दिली.

Untitled design (53)

चंद्रकांत दादांनी सुद्धा हा ओढवलेला प्रसंग हसण्यावर नेत आपलं बोलणं सुरूच ठेवलं. परंतु, चंद्रकांत दादांची खुर्ची अचानक तुटल्याने सगळ्यांची एकच भंबेरी उडाली. यावेळी त्यांच्या बाजूला माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख होते दादांची खुर्ची तुटताच ते ताड्कन उभे राहिले. या अपघातात दादा सुखरूप असल्याचे पाहून सगळ्यांना हायसे वाटले. मात्र, खुर्ची कुठलीही असो ती कधीही दगा देऊ शकते तेव्हा गाफील राहून चालणार नाही हाच बोध या खुर्ची अपघातातून सगळ्या राजकारण्यांनी घायला हवा.

Untitled design (51)

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.