आता अनिल परब यांच्या राजीनाम्यासाठी कोर्टाच्या आदेशाची वाट पहायची का? – चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनआयएच्या चौकशीखाली असलेल्या सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्ब नंतर राज्यात अजून एक खळबळ उडाली आहे. परत कामावर घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 2 कोटी रुपये मागितले होते. असा आरोप सचिन वाझे यांनी केला. सचिन वाझेने आपल्या पत्रात शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचेदेखील नाव घेतले आहे.

अनिल परब यांनीही आपल्याला खंडणी वसूल करायला सांगितली, असा खळबळजनक आरोप वाझेंनी कोर्टापुढे सादर केलेल्या पत्रातून केला आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आक्रमक झाले आहेत. आता अनिल परब यांच्या राजीनाम्यासाठी कोर्टाच्या आदेशाची वाट पहायची का? असा टोला त्यांनी लगावला.

परबांवर आरोप काय?

सचिन वाझे यांनी आज एनआयए कोर्टात एक पत्रं देऊन परब यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. परब यांनी मला जुलै-ऑगस्ट 2020 मध्ये मला बोलावून घेतलं होतं. यावेळी त्यांनी सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी)कडून 50 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. या एसबीयूटीची चौकशी सुरू होती. आधी त्यांनी मला या एसबीयूटी प्रकरणाची चौकशी करून ट्रस्टींसोबत चर्चा करायला सांगितलं होतं. नंतर केस बंद करण्याच्या नावाखाली एसबीयूटीकडून 50 लाख रुपये वसूल करण्यास सांगितले. त्याला मी नकार दिला. कारण एसबीयूटीमध्ये मी कुणालाच ओळखत नव्हतो. तसेच चौकशीशी माझा काही संबंधही नव्हता, असं वाझेंनी या पत्रात म्हटलं आहे

Leave a Comment