व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सरकार राष्ट्रवादी चालवतंय, शिवसेना- काँग्रेस मंत्र्यांनी फक्त….; चंद्रकांत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील आरोप- प्रत्यारोपाच्या फैली सुरूच आहेत. राज्यातील सरकार राष्ट्रवादी काँग्रेस चालवत असून शिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी फक्त गाड्या फिरवायच्या असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. पाटील यांच्या या टीकेला महाविकास आघाडीकडून नेमकं काय उत्तर मिळत ते आता पाहावं लागेल.

चंद्रकांत पाटील कोल्हापूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हंटल की, महाराष्ट्राचं सरकार राष्ट्रवादी चालवतंय. शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदार, मंत्र्यांनी फक्त गाड्या फिरवायच्यात. अजित पवारांचे म्हणणं खरं आहे. तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडेच आहे, बाकी कोणाकडे काही नाही, अजित पवारांच्यातच धमक आहे.

दरम्यान, राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. राज्य सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी पोलीस प्रशासनाचा दुरुपयोग करत आहे असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याचा इशारा सरकारने दिला आहे. या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, संप करणाऱ्याला मेस्मा लावणे, हे चुकीचे आहे. लोकशाहीमध्ये आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणं हा त्यांचा हक्क आहे.